Dharashiv Zilla Parishad Election : धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता. २७) राजकीय घडामोडींना वेग आला..एकूण ११८ उमेदवारांपैकी तब्बल ७३ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बंडखोर व अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींना दिवसभर मोठी कसरत करावी लागली..Local Body Elections: चाकूर तालुक्यात दोन अर्ज अवैध.तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी ८१ इच्छुक निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली होती. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती असली, तरी जागावाटप व उमेदवारीवरून अंतर्गत बंडखोरी उफाळून आली. .Local Body Elections: निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्थता अबाधित ठेवा.अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पक्षशिस्त झुगारून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. त्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठ नेते, तालुकास्तरावरील पदाधिकारी व स्थानिक नेतृत्वाने बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी धावपळ केली. .काही ठिकाणी बैठका घेण्यात आल्या, तर काही उमेदवारांशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करण्यात आली. काहींवर पक्षशिस्तीचा दबाव टाकण्यात आला, तर काहींना भविष्यातील निवडणुकांत संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. अखेरच्या क्षणापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. तरीही काही बंडखोर व अपक्ष उमेदवार माघार न घेतल्याने निवडणूक लढत चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.