Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Arunachal Government : डोंगराळ आणि थंड प्रदेश असल्याने अरुणाचल राज्यात मांसाहाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भागात जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असताना जनावरांच्या वेस्टची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नाही.
Mobile Slaughterhouses
Mobile Slaughterhouses Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : डोंगराळ आणि थंड प्रदेश असल्याने अरुणाचल राज्यात मांसाहाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. या भागात जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणावर होत असताना जनावरांच्या वेस्टची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नाही.

त्या पार्श्‍वभूमीवर अरुणाचल सरकारने मांस संशोधन संस्थेच्या मोबाइल स्लॉटर हाउसच्या वापरावर भर देण्याचे नियोजन केले आहे. केंद्रीय मांस संशोधन संस्थेला भेट देत त्यासंबंधीची माहितीदेखील अरुणाचल सरकारकडून घेण्यात आली.

Mobile Slaughterhouses
Chhatrapati Sambhajinagar Vidhansabha Election : छत्रपती संभाजीनगर शहरात १२९०, ग्रामीणमध्ये १९८३ मतदान केंद्र

केंद्रशासित भाग असलेल्या अरुणाचल राज्याचा परिसर डोंगराळ आणि थंड आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याकरिता या भागात मांसाहारावर भर दिला गेला आहे.

दोन हजार कोटी रुपयांचे वराह देशाच्या इतर राज्यांतून अरुणाचलमध्ये कत्तलीसाठी आणले जातात. परंतु या भागात शास्त्रोक्‍त कत्तलखाने नसल्याने उघड्यावर कत्तल करीत त्यापासून निघणारे वेस्ट कोठेही फेकले जाते. त्यामुळे राज्यात आरोग्यविषयक समस्या आणि अनेक भागांत दुर्गंधीदेखील पसरते, अशी स्थिती आहे.

Mobile Slaughterhouses
Suhas Kande and Sameer Bhujbal : नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात बाचाबाची; कांदेंची भुजबळांना जीवेमारण्याची धमकी

याची गांभीर्याने दखल घेत तेथील सरकारने यावर उपायांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता अरुणाचल राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धमंत्री वांगसू यांनी हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्थेला भेट दिली.

या वेळी त्यांनी विविध संशोधनाची माहिती घेतली. यातील मोबाइल स्लॉटर हाउसची संकल्पना पशुसंवर्धन मंत्री व त्यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळाला आवडली. त्यानंतर त्यांनी याला अरुणाचल राज्यात प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. नागालॅंड आणि अरुणाचल मध्ये यावर काम होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी या भागाचा दौराही केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com