Suhas Kande and Sameer Bhujbal : नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात बाचाबाची; कांदेंची भुजबळांना जीवेमारण्याची धमकी

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. यादरम्यान नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आमदार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकी दिली आहे. यावरून येथे जोरदार राडा झाला आहे.
Suhas Kande and Sameer Bhujbal
Suhas Kande and Sameer BhujbalAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा मतदानाच्या दिवशी राज्यातील विविध मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहे. पण अशाचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटात वाद होताना दिसत आहे. बारामतीसह बीड जिल्ह्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते भीडले आहेत. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला असून नांदगावात जोरदार राडा झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स अशी धमकी दिली आहे. यामुळे कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार राडा झाला आहे. येथे हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळत असून कांदे यांनी भुजबळ यांना धमकी दिल्याने वारावरण तापले आहे. यामुळे सध्या राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.

Suhas Kande and Sameer Bhujbal
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान

नांदगाव मतदारसंघातील अनेक मतदारांना नांदगाव – मनमाड रस्त्यावरून मतदारकेंद्राकडे सुहास कांदे आणत होते. अशातच अपक्ष उमेदवार समीर भुजबळांनी त्या गाड्या अडवल्या. भुजबळ आणि कांदे समोरासमोर आल्याने दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप भुजबळ यांनी केला.

तर भुजबळ यांच्या आरोपावर पलटवार करताना, आपण समीर भुजबळांचे नाव घेतले नसून अशीस कोणतीही धमकी दिलेली नाही. तर सध्या चुकीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. मीडियालाही विनंती आहे की शहानिशा करावी. एक जण मारहाण करत होता. त्याचा मर्डर होईल, असे मी बोललो असेही स्पष्टीकरण कांदे यांनी दिलं आहे.

Suhas Kande and Sameer Bhujbal
Maharashtra Assembly Election 2024 : शेती प्रश्‍नांना बगल; स्थानिक मुद्द्यांवर निवडणुकीत रंगत

बारामतीत वातावरण तंग

दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघात मतदान सुरु असताना युगेंद्र पवार यांची आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाने आपल्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच बोटाने संकेत केले जात होते, दबाव आणले जात होते असा आरोप शर्मिला पवार यांनी केला.

यावरून बारामतीत वातावरण तंग झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांनी येथे अशी कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. हवे तर सीसीटीव्ही पाहा. माझे कार्यकर्ते असे वागू शकत नाही, असे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com