Lemongrass : आरोग्यवर्धक, औषधी गवती चहा

गवती चहाचा उपयोग परफ्यूम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे लोशन, डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी देखील सर्वात जास्त प्रमाणात होतो.
 Lemongrass
LemongrassAgrowon
Published on
Updated on

गवती चहा (Lemongrass) ही वनस्पती सुगंधी आणि औषधी वनस्पती (Aromatic And Medicinal Plant) म्हणून ओळखली जाते. गवतीचहाच्या पानांपासून ऊर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. गवती चहाचा उपयोग परफ्यूम, साबण, निरमा, डिटर्जंट, तेल, केसांचे लोशन, डोकेदुखीची औषधे आणि सौंदर्यप्रसाधने (Cosmetics) तयार करण्यासाठी देखील सर्वात जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्‍या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. गवती चहाची लागवड खरीप हंगामात केली जाते. लागवड ठोंबा (खुंटा) पासून, तसेच बियांपासून रोपे तयार करुन केली जाते.

 Lemongrass
Herbal Tea : स्वादयुक्त गवती चहा व्यवसायाने सावरला संसार

गवतासारखी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती १.५-२ मी. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात.

भारतात गवती चहाची शेती केरळ, तामिळनाडू, आसाम,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांमध्ये होते. देशातील इतर राज्यांमध्ये गवतीचहाच्या शेतीचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. तिथे देखील याची शेती करण्यासाठी प्रोस्ताहन दिलं जात आहे. गवतीचहाच्या शेतीसाठी नाबार्डकडून कर्ज देखील दिलं जाते. गवती चहाची शेती कमी पावसाच्या प्रदेशातही केली जाते.

 Lemongrass
Organic Farming: श्रीलंकेतल्या चहा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती कशी आहे?

गवती चहाची शेती कशी केली जाते?

गवती चहाची शेती भात शेतीप्रमाणं केली जाते. याच्या बियांपासून नर्सरीमध्ये रोपं बनवली जातात. त्यानंतर रोपं वाढली की तिथून काढून जमिनीमध्ये लावली जातात. एका हेक्टरवर गवती चहा लावायचा असल्यास त्यासाठी रोपं तयार करण्यासाठी 4 किलो बियाणं लागते.

गवती चहाचे आरोग्यविषयक फायदे

१. सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.

२. पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.

३. थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.

४. जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.

५. डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.

६.गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.

७. शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com