Tirthatan Yojana : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटन योजनेस मान्यता

Maharashtra Government Scheme : महाराष्ट्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थाटन करता यावे यासाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
Mantralay
MantralayAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थाटन करता यावे यासाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देऊन मन:शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी ही योजना सर्वधर्मींयांसाठी आणल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील ६६ आणि देशातील ७३ तीर्थस्थळांना भेटी देता येणार आहेत. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जाणार असून अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा असलेल्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती.

Mantralay
Central Government Scheme : केंद्राच्या योजनांचा विविध घटकांना लाभ

चारधाम यात्र, वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा येथे अनेक ज्येष्ठ नागरिकांना जावे वाटते पण त्यांना आर्थिक अडचणी येत असल्याचे सरकारचे मत होते. त्यामुळे विधानसभेत आमदारांनी तशी मागणी केली होती. त्यानंतर ही योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेतर्गत राज्याबाहेरील ७३ आणि राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

Mantralay
Government Scheme : वैयक्तिक लाभाच्या योजनांचे प्रस्ताव पाठवा

यात वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुहा, सुवर्ण मंदिर, अक्षरधाम मंदिर, गंगोत्री, वैद्यनाथ धाम, इस्कॉन मंदिर, वृंदावन, श्रीराम मंदिर, सूर्यमंदिर आदी तीर्थस्थळांचा समावेश आहे. तर राज्यातील मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, चैत्यभूमी, माऊंट मेरी चर्च, जोतिबा, अंबाबाई मंदिर, रेणुका मंदिर, माहूर आदींसह ६६ तीर्थक्षेत्रांना जाता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच प्रवासासाठी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असल्यानंतरच प्रवासाची अनुमती असेल. लॉटरी पद्धतीने हे लाभार्थी निवडले जाणार आहेत. योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच अधिवास प्रमाणपत्र आणि रेशनकार्ड असावे. सोबत उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com