Milch Animal Subsidy Scheme : राज्यात अनुदानावरील दुधाळ जनावरे वितरणासाठी मंजुरी

‘मराठवाडा पॅकेज’मधून जालन्यासाठी दोन हजार गट
Milch Cattle
Milch Cattle Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mumbai News : राज्यातील दुग्धोत्पादनात (Milk Production) वाढ करण्यासाठी राज्य सरकारने दुधाळ गायी व म्हशींच्या गटांच्या वितरणासाठी विविध प्रवर्गांसाठी अनुदान जाहीर केले आहे.

सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के, अनुसूचित जाती, जमाती आणि आदिवासी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानावर जनावरांचे गट वितरित करण्यात येणार आहेत. तसेच मराठवाडा पॅकेजअंतर्गत जालना जिल्ह्यासाठीही दोन हजार गट देण्यात येतील.

दरम्यान, या योजनेअंतर्गत एक ते दोन महिने व्यालेली जनावरे खरेदी करावी लागतील. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची ती असावीत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. निवड समिती लाभार्थींची निवड करेल.


या योजनेची व्यापक जाहिरात व प्रसिद्धी करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांमध्ये ३० टक्के महिलांना प्राधान्य राहील.

ऑनलाइन अर्जांची छाननी करून लाभार्थी समितीमार्फत निवडण्यात येतील. प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी पाच वर्षे ग्राह्य धरण्यात येईल.

Milch Cattle
Milch Animal Scheme : दुधाळ जनावरांच्या किमतीत दुपटीने वाढ

जालन्यात दुधाळ जनावरे योजना
मराठवाडा पॅकेजअंतर्गत जालना जिल्ह्यात दुधाळ जनावरे योजना राबविण्यात येईल. या अंतर्गत दोन देशी किंवा संकरित गायी आणि दोन म्हशींचा एक गट अनुदानास पात्र असेल.

देशी किंवा संकरित प्रतिगाय ७० हजार, तर म्हैस ८० हजार रुपयांना खरेदी केल्यास तसेच परराज्यांतून वाहतूक खरेदी केल्यास प्रतिगाय, म्हैस १० हजार असा एकूण खर्च गाईसाठी १ लाख ५० हजार, तर म्हशींसाठी १ लाख ७० हजार खर्च अपेक्षित आहे.

या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येईल. यामध्ये तीन वर्षांसाठी ८ हजार ४२५ व म्हशींसाठी ९ हजार ६२९ रुपये विमा खर्च देण्यात येईल.

अनुसूचित जाती, जमातींसाठी ७५ टक्के अनुदान
अनुसूचित जाती, जमातींसाठी (आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरील) ७५ टक्के अनुदानावर दोन दुधाळ देशी किंवा संकरित गायी आणि दोन म्हशींचा एक गट देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हे अनुदान मिळेल.

यातील गायींच्या एका गटासाठी एक लाख पाच हजार, तर म्हशींच्या गटासाठी १ लाख २० हजार व विमा अनुक्रमे १२ हजार ६३८ व १४ हजार ४४३ असा राहील.

गायींसाठी १ लाख १७ हजार व म्हशींसाठी १ लाख, ३४ हजार, ४४३ रुपयांचे अनुदान मिळेल. लाभार्थ्यांना पाच टक्के स्वत: व २५ टक्के बँकेच्या कर्जातून रक्कम उभारावी लागेल.

सर्वसाधारण गटासाठी ५० अनुदान
सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना दोन देशी किंवा संकरित गायी व दोन म्हशींचा गट ५० टक्के, तर अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान मिळेल.

५० टक्के अनुदानावर गाईंसाठी ७८ हजार ४२५, तर म्हशींसाठी ८९ हजार ६२९, तर ७५ टक्के अनुदानावर गाईंसाठी १ लाख १७ हजार ६३८ व म्हशींसाठी १ लाख ३४ हजार ४४३ रुपये देण्यात येतील.

Milch Cattle
Milch Animal Diet : दुधाळ जनावरांसाठी अधुनिक आहार पद्धती कोणत्या आहेत?

सुधारित जातींची जनावरे देणार
प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी संकरित गायी व प्रतिदिन आठ ते १० लिटर दूध देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपाकर, प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी, तसेच मुऱ्हा व जाफराबादी या सुधारित जातींच्या म्हशी देण्यात येतील.

दुधाळ जनावरे ही शक्यतो १ ते २ महिन्यांपूर्वी व्यालेली व दुसऱ्या व तिसऱ्या वेताची असावीत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com