Nashik News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. या घटनेचे तीव्र पडसाद कृषी क्षेत्रातही उमटले. दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बुधवारी (ता. २८) दुपारपासून व्यवहार ठप्प झाले. तर गुरुवारी (ता. २९) बहुतांश ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. यामुळे कोट्यवधींची उलाढाल थांबली असून बाजार आवारात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला..नाशिक बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते. मात्र बाजार समिती प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, बुधवारी (ता. २८) रात्री १२ पासून ते गुरुवारी (ता. २९) रात्री १२ पर्यंत बाजार समितीतील लिलाव आणि इतर सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले. सकाळी मुख्य प्रवेशद्वारांसह इतर आवारांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. व्यापाऱ्यांनीही स्वतःहून दुकाने बंद ठेवून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला..Ajit Pawar Death: राज्यात बाजार समित्या बंद.बाजार समिती बंद राहणार असल्याचा संदेश ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे काही शेतकरी शेतीमाल घेऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते. लिलाव बंद असल्याने आणि माल परत नेणे परवडणारे नसल्याने, या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि इतर शेतीमाल प्रवेशद्वारावरच किरकोळ ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकला.व्यवहार बंद असल्याने भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने मुंबई आणि गुजरातकडे होणारा पुरवठादेखील विस्कळीत झाला होता..Ajit Pawar Death: ...आणि बारामती पोरकी झाली .कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून दुकाने बंद ठेवून श्रद्धांजलीनाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या धक्क्याने जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात शोककळा पसरली. दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी व्यावसायिकांनी बुधवारी (ता. २८) व्यवहार स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवले, अशी माहिती नाशिक जिल्हा अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे (नाडा) अध्यक्ष अरुण मुळाणे यांनी दिली. ‘नाडा’ने सर्व कृषी व्यावसायिकांना व्यवहार बंदचे आवाहन केले होते..जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदपिंपळगाव बाजार समितीच्या मुख्य व उपबाजारात अवारावर बुधवारी (ता. २८) दुपारपासून ते गुरुवारी (ता. २९) पूर्ण दिवस कामकाज बंद होते. त्यामुळे कांद्यासह भुसार मालाची आवक ठप्प झाली होती. सिन्नर, देवळा, उमराणे, कळवण, मालेगाव बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारावर गुरुवारी कामकाज बंद होते. येवला बाजार समिती गुरुवारी अर्धा दिवस बंद ठेवून दुपारनंतर शेतीमालाचे लिलाव करण्यात आले. लासलगाव, सटाणा, नामपूर, मनमाड, बाजार समित्यांत बुधवारी दुपारनंतर व्यवहार बंद होते. तर गुरुवारी सुरू होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.