Botanicals Capsules : प्रतिजैविकांना पर्यायी वनस्पतिजन्य ‘इन कॅप्सूल’!

Antibiotics Update : पशुपक्षिपालनामध्ये होत असल्याने प्रतिजैविकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. अनेक जिवाणूंनी प्रतिजैविकांसाठी प्रतिरोधकता विकसित केली असल्याने अशा आजाराविरुद्ध प्रतिजैविकांचा वापर तितका प्रभावी ठरत नाही.
Botanicals Capsules
Botanicals CapsulesAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : पशुपक्षिपालनामध्ये होत असल्याने प्रतिजैविकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. अनेक जिवाणूंनी प्रतिजैविकांसाठी प्रतिरोधकता विकसित केली असल्याने अशा आजाराविरुद्ध प्रतिजैविकांचा वापर तितका प्रभावी ठरत नाही. हीच बाब लक्षात घेऊन हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्था आणि नागपूर येथील माफसूने वनस्पतिजन्य घटकांसोबतच ‘सिल्वर नॅनो पार्टिकल’ यांच्या एकत्रीकरणातून औषध तयार केले आहे. त्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी ‘इन कॅप्सूलेशन’ केले आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये त्याचा वापर फायदेशीर ठरेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे आणि ‘माफसू’चे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांनी या विषयी माहिती देताना सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये प्रतिजैविकांची उपयुक्तता कमी होत चालली आहे. पक्ष्यामधील जिवाणूजन्य आजारांवरील उपचारांमध्ये ती प्रभावी ठरेनाशी झाली आहेत. परिणामी भारतासह जगभरात पक्ष्यातील जिवाणूंवर प्रभावी ठरेल अशा तंत्रज्ञानाच्या विकासावर सातत्याने संशोधन केले जात आहे.

Botanicals Capsules
Prawns Antibiotics : भारतीय कोळंबीत आढळली प्रतिजैविके

पोल्ट्री व्यवसायात जिवाणूचा प्रादुर्भावामुळे पक्ष्यांना डायरीया होऊन वाढ खुंटते. अपेक्षित वजन न मिळाल्याने उत्पादन प्रभावित होते. त्यामुळे प्रतिजैविकांना पर्याय शोधताना ६० ते ७० वनस्पतिजन्य घटकांवर संशोधन केले व त्यातून अधिक उपयुक्त ठरणाऱ्या युजेनॉल किंवा थाईम ऑईल (तुळस किंवा लवंगामधील मुख्य घटक) आणि सिनॅमॉलडिहाइड (दालचिनीमधील मुख्य घटक) हे वनस्पतिजन्य घटकांचे चांदीच्या अतिसूक्ष्म कणांसोबत (सिल्व्हर नॅनो पार्टीकल्स) एकत्रिकरण करून औषधाची निर्मिती केली आहे. त्याचा प्रभाव वाढविण्यासाठी त्याचे कॅप्सूलमध्ये रूपांतर केले. हे कॅप्सूल पाण्याद्वारे किंवा पशुखाद्यासोबत मिसळून देता येते. ते प्रभावी असल्याने प्रतिजैविकांचा वापर कमी होण्यास मदत होईल. या इन कॅप्सूलच्या उत्पादनासाठी ठाण्याच्या एका कंपनीसोबत नुकताच सामंजस्य करारही करण्यात आला आहे.

Botanicals Capsules
Antibiotic Use : पशू,पक्षांमध्ये प्रतिजैविकाचा वापर, प्रतिरोध अन् मानवी आरोग्य

...अशा घेतल्या चाचण्या

तेलंगणा, महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्ये तीन ते चार हजार पक्ष्यांमध्ये याच्या चाचण्या घेण्यात आल्या. या औषधांच्या परिणामांची ‘ओईसीडी गाईडलाईन’ प्रमाणे तपासणी करण्यात आली. त्याच प्रमाणे त्याचे ‘साईड इफेक्‍ट’ तपासले गेले. त्यातून हे हर्बल औषध जिवाणूजन्य आजारांवर प्रभावी असून, पक्ष्यांमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले.

हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. बी. बारबुद्धे यांनी सांगितले, की पक्ष्यांना जिवाणूंच्या प्रादुर्भाव झाल्यास त्याचा त्यांच्या शरीरातील यकृत, मुत्रपिंडावर सर्वांत आधी परिणाम होतो. पूर्वी त्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जाई. मात्र सततच्या वापरामुळे जिवाणूंनी या प्रतिजैविकासाठी प्रतिरोधकता विकसित केली आहे. त्यामुळे त्यांची परिणामकारकता कमी झाली आहे. अशा स्थितीमध्ये पक्ष्यांचे जिवाणूपासून संरक्षण करण्यासाठी आमचे हे संशोधन उपयुक्त ठरेल.

देशात प्रथमच झालेल्या या संशोधनाची दखल भारतीय कृषी संशोधन परिषदेने घेतली असून, नुकत्याच पार पडलेल्या संस्थेच्या स्थापना दिन कार्यक्रमामध्ये या तंत्रज्ञानाला ‘आयसीएआर बेस्ट टेक्नॉलॉजी’ म्हणून गौरविण्यात आल्याचेही डॉ. बारबुद्धे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com