Loan Waiver: भांडवलदारांचे कर्ज कोणत्याही निकषांशिवाय माफ करणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांना मात्र प्रत्येक वेळी अटी-शर्तींच्या जाचात अडकवले जाते. कर्जमाफी, आयात-निर्यात धोरणे आणि बाजार हस्तक्षेप यामध्ये सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेतली गेल्याने शेतीमालाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे सरकारची धोरणे ही शेतकरीविरोधी असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी केला..चिलगव्हाण येथे शेतकरी (कै.) साहेबराव करपे यांना अभिवादन करताना ते बोलत होते. १९ मार्च १९८६ रोजी आर्थिक विवंचनेतून साहेबराव करपे यांनी आपल्या कुटुंबीयांसह जीवन संपविले होते. देशातील पहिली नोंद झालेली शेतकरी आत्महत्या म्हणून या घटनेचा उल्लेख केला जातो. .Farmer Crisis: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप राज्य सरकारने केले.विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पत्र लिहून शेतीतील बिकट परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर देशभरात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अधिक तीव्र होत गेला.या पार्श्वभूमीवर दरवर्षी १९ मार्च रोजी चिलगव्हाण येथे (कै.) करपे यांना अभिवादन केले जाते. राज्यभरातील शेतकरी या दिवशी एक दिवसाचा उपवास करून आंदोलन करतात..Farmer Crisis: एकोणीस मार्चला का करायचा उपवास?.या कार्यक्रमात मनीष जाधव यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या या केंद्र व राज्य सरकारच्या कृषीविरोधी धोरणांचे परिणाम असून या ‘धोरणात्मक हत्या’ असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली..चिलगव्हाण येथील आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विनायक देशमुख (लातूर), मराठा सेवा संघाचे संदीप शिंदे, प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, भीमराव भालेराव, सरपंच प्रभावती प्रमोद काळे, पोलीस पाटील डॉ. लक्ष्मण बोरकुट, पंजाबराव पारध, सुनील मंदाडे, विनायक बोरकुट, शामराव काळे, अशोक काळे, सुधाकर काळे, रमेश करपे, राहुल भामकर, आतिश डोंगरे, योगेश हातमोडे, ज्ञानेश्वर खंदारे, दिलीप रावते, प्रकाश खंदारे, दिनेश खाडे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.