Annasaheb Patil Loan Scheme: १५ लाखांपर्यंत कर्ज आणि व्याज परताव्याची सुविधा; जाणून घेऊया आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची संपूर्ण माहिती
Business Loan Scheme: या योजनेंतर्गत १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि या कर्जावर जास्तीत जास्त ४.५ लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा दिला जातो. या व्याज परताव्याचा कालावधी कमाल ७ वर्षे असून व्याजदराची कमाल मर्यादा वार्षिक १२ टक्के आहे.