Animal Market : जनावरांचा बाजार गजबजला

लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे रिसोड तालुक्यात अनेक गुरे दगावली आहेत.
Animal Market
Animal MarketAgrowon

Washim News : गेल्या काही महिन्यापासून बंद असलेला गुरांचा बाजार आता पुन्हा गजबजू लागला आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही हे व्यवहार सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (ता.१६) येथील गुरांच्या बाजारामध्ये लाखोंची उलाढाल झाली.

Animal Market
Lampy Skin : ‘लम्पी स्कीन’बाधित ४ हजार ९६४ जनावरे उपचारानंतर बरी

लम्पी स्कीनच्या (Lampy Skin) प्रादुर्भावामुळे रिसोड तालुक्यात अनेक गुरे दगावली आहेत. यासोबत गुरांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना मोठी धावपळसुद्धा करावी लागली होती. पशुवैद्यकीय विभागाने विशेष मोहीम राबवून गुरांवर उपचार केले.

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव पाहता सरकारने गुरांचा बाजार आणि वाहतुकीवर बंदी घातली होती. मात्र सध्या लम्पी स्कीन आटोक्यात आल्याने व बाधित गुरांची संख्या नगण्य झाल्याने जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गुरुवारी (ता. १६) रिसोड येथील आठवडी बाजाराबरोबरच जनावरांचा बाजारही भरला होता. शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांतून रिसोड गाठले.

बाजारात लाखो रुपयांचा व्यवसाय झाला. एवढेच नव्हे तर बाजारानिमित्त जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचाही चांगला व्यवसाय झाला आहे. गुरांच्या बाजारावरील बंदी उठल्यानंतर वाहनचालक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी ही मोठी सोय मानली जात आहे.

आजवर बाजार बंद असल्याने येथे दर आठवड्याची मोठी उलाढाल ठप्प झाली होती. गुरांचा बाजार सुरू होताच शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी वर्दळसुद्धा वाढली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com