Maharashtra Government Scheme: राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना राज्य सरकारने भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे..याबाबतचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने जारी केला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ४२. ८१ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. .Anganwadi Workers: अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सप्टेंबरचे मानधन वेळेत मिळणार, शासन निर्णय जारी .एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना ४२ कोटी, ८१ लाख ९४ हजार इतका निधी उपलब्ध करुन देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे..Anganwadi Employee Benefits: अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू.एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तत्काळ अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. .२ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी सेविका, मदतनीसांना मिळणार लाभराज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्यातील २ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे..गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.