Raigad News: डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत पारंपरिक तूर, तीळ, वाल यासारख्या पिकांची लागवड केली जाते. पण त्यासाठी येणारा खर्च अधिक असल्याने कमी खर्च, श्रमामुळे शेतकरी ताग उत्पादनाकडे वळाला आहे. .ताग हे पीक पेरणीनंतर अवघ्या तीन महिन्यांत उत्पन्न देणारे असून कमी मशागत, अल्प खर्चात लागवड करता येते. पूर्वी तागाचा वापर प्रामुख्याने हिरवळीच्या खतासाठी केला जात होता. मात्र, सध्या शेतकरी तागाच्या बियांच्या विक्रीकडे अधिक लक्ष देत आहेत. .Jute Cultivation : कमी श्रमात अधिक उत्पन्नासाठी तागाची लागवड.या बियांना बाजारात चांगली मागणी असून गुजरातमधील व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहेत. तागाला हिरवळीचे खत म्हणून ओळखले जाते..Jute Production : अल्प खर्चाच्या ताग उत्पादनाकडे ओढा.या पिकाला बाहेरून नत्र देण्याची गरज नसून, स्वतःच जमिनीत नत्रनिर्मिती करून जमिनीची सुपीकता वाढवते. परिणामी, रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेती अधिक जैविक आणि शाश्वत बनते. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाच्यापार्श्वभूमीवर ताग शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे..ताग औषधी उपयोगासाठी वापरला जातो. त्याचबरोबर शेतीला जैविक सुपीकता देणारे पीक आहे. तागापासून धागाही काढला जातो. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ताग उत्पादन करावे.- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.