Dairy Products Growth:अमूल’ (आणंद मिल्क युनियन लिमिटेड) या आघाडीच्या डेअरी कंपनीने आर्थिक उलाढालीच्या बाबतीत १ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. तसेच डेअरी उत्पादनांची मागणी वाढल्याने या उलाढालीत मागच्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढ झाली..‘अमूल’ ब्रँडचे विपणन करणाऱ्या ‘दि गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ने (जीसीएमएमएफ) यासंदर्भात प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यानुसार, कंपनीची स्वतःची आर्थिक उलाढाल ११.४ टक्क्यांनी वाढून ती ७३,४५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील ती ६५,९११ कोटी रुपये होती. त्या व्यतिरिक्तच्या उलाढालीचा वाटा जिल्हा सहकारी संघांचा आहे. १,२०० हून अधिक उत्पादने, विशाल वितरण नेटवर्क आणि आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजांची दखल या त्रिसूत्रीमुळे हा टप्पा गाठणे शक्य झाल्याचे कंपनीने म्हटले आहे..Amul Dairy Industry: ‘अमूल’चा आदर्श.‘‘स्थानिक बाजाराला अनुकूल धोरणांची आखणी आणि ‘अमूल’ ब्रँडची ताकद यांचा संयोग साधून फेडरेशन आणि त्याचे १८ सदस्य जिल्हा सहकारी संघ डेअरी क्षेत्रात आघाडी घेत आहेत,’’ असे ‘जीसीएमएमएफ’ने आपल्या अहवालात म्हटले आहे..‘जीसीएमएमएफ’चे अध्यक्ष अशोकभाई चौधरी म्हणाले, ‘‘१ लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठणे हे लाखो ग्राहकांचा विश्वास आणि ३६ लाख दूध उत्पादकांच्या अथक परिश्रमाचे प्रमाणपत्र आहे.’’ उपाध्यक्ष गोरधनभाई धमेलिया म्हणाले, ‘‘सहकाराच्या भावनेचा विजय म्हणजे हा टप्पा आहे. ‘अमूल मॉडेल’ हे आर्थिक लोकशाही साध्य करण्यासाठीचे ‘ब्लू प्रिंट’ आहे..जगातील सर्वांत मोठा सहकारी डेअरी उद्योग‘जीसीएमएमएफ’ हा शेतकऱ्यांचा मालकीचा जगातील सर्वात मोठा सहकारी डेअरी उद्योग आहे. तब्बल ३६ लाख दूध उत्पादक त्याचे सभासद आहेत. पन्नासहून अधिक देशांत ‘अमूल’ दूध आणि आणि इतर डेअरी उत्पादने विकली जातात. तसेच तो भारतातील सर्वांत मोठी ‘एफएमसीजी’ (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गूड्स) उद्योग आहे..Silk Milk Project: ‘सिल्क-मिल्क’ प्रकल्प अंतर्गत ११० शेतकऱ्यांची निवड.स्पेन, युरोपियन युनियनमध्येही विस्तारअलीकडील काळात ‘अमूल’ने अमेरिकेपाठोपाठ स्पेन आणि युरोपियन युनियनमध्ये आपली उत्पादने दाखल करून उद्योगविस्तार केला आहे..तेथील भारतीय लोकसंख्येव्यतिरिक्त स्थानिकांनाही ‘अमूल’ने लक्ष्य केले आहे. तसेच या संस्थेकडून दररोज ३१ दशलक्ष लिटर दूध गोळा केले जाते आणि वर्षाला २४ अब्ज पॅकबंद उत्पादने (दूध, चीज, तूप, आइस्क्रीम इ.) वितरित केली जातात..नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘अमूल’ला ‘इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स’च्या ‘वर्ल्ड को-ऑपरेटिव्ह मॉनिटर’ने जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था म्हणून गौरवले होते..‘अमूल’चा पसाराएकूण उलाढाल १ लाख कोटी रुपये (११ टक्के वाढ)दूध उत्पादक सदस्य ३६ लाखदैनिक दूध संकलन ३१ दशलक्ष लिटरवार्षिक वितरण २४ अब्ज पॅकबंद उत्पादनेउत्पादनांची संख्या १,२०० हून अधिकजागतिक स्थान सर्वांत मोठा सहकारी डेअरी उद्योग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.