उमेश सूर्यवंशी, सोमनाथ यादवअमृत कटला जातीचे मासे जलद गतीने वाढतात. या जातीला बाजारपेठेत चांगला दर मिळतो. विक्रीयोग्य मासे मोठ्या आकाराचे मिळतात. यामुळे सरासरी नफा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. शेततळ्यात मत्स्यपालन करताना अमृत कटला प्रजातीचा वाढ दर इतर जातींपेक्षा जलद असल्याने तळ्यातील रोहू, मृगल यांच्याशी योग्य प्रमाणात संतुलन ठेवणे आवश्यक आहे..भारतातील मत्स्य उत्पादनात गोड्या पाण्यातील पोलिकल्चर पद्धतीचे महत्त्व मोठे आहे. या पद्धतीत कटला (Labeo catla) ही प्रजाती झपाट्याने वाढणारी, बाजारात चांगला भाव मिळणारी आणि ग्राहकप्रिय जात आहे. कार्प प्रजाती असली तरी तिच्या वाढीचा दर, वजन क्षमता आणि उत्पादन स्थिरतेबाबत अनेक वर्षे मर्यादा जाणवत होत्या. या मर्यादांवर मात करण्यासाठी भुवनेश्वर येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी शास्त्रीय पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जनुक सुधारणा कार्यक्रम राबवला आणि त्यातून अमृत कटला ही जात विकसित करण्यात आली.केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी २०१० मध्ये कटला प्रजातीची वाढ, वजन क्षमता वाढवण्यासाठी सुधारणाऱ्या दीर्घकालीन निवडक प्रजनन कार्यक्रमाची सुरुवात केली..Fish Farming: रत्नागिरीत मत्स्य संवर्धनासाठी ३२ शेतकरी सज्ज.देशातील विविध पर्यावरणीय परिस्थितीत उपलब्ध असलेल्या कटला प्रजाती पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून गोळा करण्यात आल्या. यानंतर कंबाईन फॅमिली सिलेक्शन’ या अत्याधुनिक पद्धतीने मायक्रोसॅटेलाइट मार्कर्सचा वापर करून उत्कृष्ट जनुके आणि इच्छित गुणधर्म असलेली प्रजाती निवडण्यात आली. ही प्रक्रिया अनेक पिढ्यांत पुनरावृत्ती करून शास्त्रशुद्ध पद्धतीने स्थिरीकरण करण्यात आले. या दीर्घकालीन संशोधनाचा परिणाम प्रभावशाली ठरला..साधारण सहा वर्षांच्या वैज्ञानिक परीक्षणानंतर सुधारित कटला जातीने स्थानिक प्रजातीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के अधिक वाढ दाखवली.प्रत्यक्ष शेततळ्यांमध्ये या जातीने १.८ किलोपर्यंत वजन एका वर्षात गाठले, तर सर्वसाधारण कटलाचे सरासरी वजन १.२ किलोच्या आसपास होते.ही वाढ फक्त बाजारातील भाव वाढवणारी नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन कार्यक्षमतेतही मोठी सुधारणा करणारी आहे..Fish Farming: मत्स्य बीज वाहतूक, पॅकिंग आणि संचयन पध्दत.उत्पादनवाढीतील भूमिकाभारत दरवर्षी कार्प उत्पादनात जागतिक पातळीवर अग्रस्थानी आहे. कटला ही त्यातील महत्त्वाची प्रजात असली तरी तिच्या उत्पादन मर्यादांमुळे एकूण वाढीत मर्यादा येत होत्या. मात्र अमृत कटला जातीमुळे देशातील कटला जातीचे वार्षिक उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे..निर्यातयोग्य दर्जाचे मासे उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागात अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. महिला बचत गटांसाठी नवीन उद्योजकीय संधी आहेत. अशा प्रकारे ही जात केवळ संशोधन-प्रयोगशाळेत मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करण्यात आली आहे..Fish Farming : अतिवृष्टीचा मत्स्य व्यावसायिकांना मोठा फटका.अमृत कटला संवर्धनाचे फायदेअमृत कटला मत्स्य जातीची सर्वांत मोठी ताकद म्हणजे वाढ दर. कमी कालावधीत जास्त वजन म्हणजे कमी खाद्य खर्च, कमी उत्पादन खर्च आणि जास्त बाजारभाव.नफ्यात तब्बल २५ ते ३० टक्के वाढ मिळते. जास्त वजनामुळे उत्पादन वाढते. विक्रीयोग्य मासे मोठ्या आकाराचे मिळतात. यामुळे सरासरी नफा २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.वाढीची स्थिरता आणि गुणवत्तेची खात्री मिळते. जनुक सुधारित प्रजातीचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे गुणधर्मांची सातत्यपूर्ण अभिव्यक्ती..देशाच्या विविध हवामानात अनुकूल जात आहे. पूर्वोत्तर राज्ये, बंगाल, ओडिशा किनारपट्टी, महाराष्ट्रातील दुष्काळी भागात सर्व ठिकाणी चाचण्यांमध्ये प्रजातीने स्थिर परिणाम दाखवले. मिश्र संवर्धन पद्धती मध्येही उत्कृष्ट अनुकूलता दिसून आली.शाश्वत मत्स्यपालनाला चालना मिळते. वेगवान वाढीमुळे कमी कालावधीत उत्पादन वाढ मिळते.त्यामुळे खाद्याचा परिणामकारक वापर, पाण्याचा कमी वापर, तळ्याच्या जागेचा अधिक लाभ..प्रजातीचे महत्त्वट्रेडमार्क नोंदणीकृत जात.उकृष्ट तंत्रज्ञान पुरस्कारानेसन्मानित.देशभर वितरणासाठीएनएफडीबी आणि राष्ट्रीय गोड्या पाण्यातील मत्स्य बीज बॅंकेची विशेष व्यवस्था.राज्य पातळीवर प्रशिक्षण, बियाणे उपलब्धता व तांत्रिक मार्गदर्शनासाठी वेगळा आराखडा तयार..मार्गदर्शक सूचनाप्रमाणित मत्स्य बीजच खरेदीकरावे. एनएफएफबीबी आणि मान्यताप्राप्त हॅचरीकडून मिळालेल्या मत्स्य बीजावर ‘CIFA–Amrit Catla’ असा शिक्का असतो. मिश्रित किंवा अज्ञात स्रोतांपासून मत्स्य बीज घेऊ नये.तळ्याचे व्यवस्थापनमहत्त्वाचे आहे. पाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला ऑक्सिजन आणि पोषण यांचे नियमित निरीक्षण आवश्यक आहे. सुधारित जातीची पूर्ण क्षमता मिळवण्यासाठी तांत्रिक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.अमृत कटला प्रजातीचा वाढ दरइतर जातींपेक्षा जलद असल्याने तळ्यातील रोहू, मृगल यांच्याशी योग्य प्रमाणात संतुलन ठेवणे आवश्यक आहे. जास्त संचयन घनता माशांच्या वाढीवर परिणाम करू शकते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.