Fertilizer Update : अमरावती जिल्ह्याला तीन लाख टन खतांची गरज

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण २ लाख ९७ हजार टन खतांची गरज असून, तशी मागणी कृषी विभागाकडून नोंदविण्यात आली आहे.
Fertilizer
Fertilizer Agrowon

Amravati News : येत्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) जिल्ह्याला एकूण २ लाख ९७ हजार टन खतांची गरज असून, तशी मागणी कृषी विभागाकडून (Agriculture Department) नोंदविण्यात आली आहे. युरिया व डीएपीचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असून, यंदा खतांची टंचाई (fertilizer Shortage) जाणार नाही असा दावा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामात ६ लाख ८० हजार ८५० हेक्टर क्षेत्रात पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. कापूस व सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यासोबतच तुरीला यंदा मिळालेले चढे दर बघता क्षेत्रवाढीची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात रासायनिक खत मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. गतवर्षीचा रब्बी हंगामातील शिल्लक कोटा धरून विविध खरीप पिकांसाठी २ लाख ९७ हजार ८०५ टन खत लागणार आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

Fertilizer
Fertilizer Stock : सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध

शेतकरी प्रामुख्याने युरिया व डीएपीची मागणी अधिक करतात. या दोन्ही खतांचा दरवेळी हंगामात तुटवडा जातो. ही बाब लक्षात घेत नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. युरियाची ६५ हजार व डीएपीची ४३ हजार टन मागणी करण्यात आली आहे.

एमओपी, एसएसपी यासह उर्वरित सर्व खतं मिळून २ लाख ९७ हजार ८०५ टन खत लागणार आहेत. या महिन्यातच खतांच्या रॅक उपलब्ध होण्यास प्रारंभ होणार असून, त्यासाठी गोदामांची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.

...असे आहे नियोजन (मे.टन)

युरिया - ६५,०००

डीएपी - ४३,०००

एमओपी - ३०,१७०

एसएसपी - ४९,६७५

एएस - १५,२१०

Fertilizer
Fertilizer Subsidy : यंदा खत अनुदानावरील खर्च कमी होणार

१०ः २६ः२६ - २६,०००

१२ : ३२ : १६- ८,०००

१४ः३५ः१४ - ४,०००

१५ः१५ः १५ - ७,०००

१६ः१६ः१६ - ५५००

१९ः१९ः१९- ३५००

२०ः२०ः० - ६,०००

२० : २० : १३ - १७,०००

१७ : १७ : १७- १७,७५०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com