MLA Ambadas Danve: कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणी आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उबाठा) आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी (ता.१८) संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारलं आहे. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत महामार्गावर टायर जाळला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहचून दानवे यांना ताब्यात घेतले आहे..आंदोलनाबाबत भूमिका मांडताना आमदार अंबादास दानवे म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार १२ रुपये ३५ पैसे अनुदान देणार असल्याचे सांगत आहे. परंतु ते काही खरे नाही. शेतकऱ्यांना एक रुपया नाही तर केवळ पन्नास पैसे क्विंटल मागे दर मिळत आहे." असेही त्यांनी सांगितले..Ambadas Danve: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त.पोलिसांनी परवानगी नाकारलीआमदार दानवे यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल, असे कारण पोलिसांकडून देण्यात आले होते. परंतु दानवे यांनी शेतकरी आणि शिवसेना कार्यकर्त्यांसह गळ्यात कांद्याच्या माला घालून वैजापूर जवळच्या समृद्धी महामार्गावर प्रवेश केला. या आंदोलनासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज नसल्याचे दानवे म्हणाले..सरकारविरोधात घोषणाबाजीआमदार दानवे यांनी टायर जाळून फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारचा निषेध असो! अशा घोषणा दिल्या. तसेच सरकारने कांद्याला २ हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून दानवे यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात झाली आहे..प्रमुख मागण्या काय?- नाफेडमार्फत तत्काळ कांदा खरेदी सुरु करावी.- कांद्याला किमान २ हजार रुपये हमीभाव आणि १ हजार ५०० रुपये अनुदान द्यावे.- निर्यात कायमस्वरूपी खुली ठेवून खत अनुदान थेट खात्यात जमा करावे.- कांदा चाळीसाठी ७५ टक्के अनुदान व दर्जेदार बियाणे सवलतीत द्यावे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.