Pune Market Rates: दुसऱ्या टप्प्यात हापूस आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. वाढत्या आवकेमुळे हापूस आता सर्वसामान्यांना चाखता येणार आहे. पहिल्या टप्प्यात एक ते दीड हजार रुपये डझन असलेला आंबा आता ५०० ते ८०० रुपये डझनापर्यंत आला आहे. .गुढीपाडवा, अक्षय तृतीया सणांचा कालावधी संपल्यानंतर बाजारातील मागणी कमी झाली. तसेच देशासह राज्यात वाढलेल्या तापमानामुळे दुसऱ्या टप्प्यातील आंबा लवकर परिपक्व होऊ लागला. वाढत्या उष्म्यामुळे आंबा भाजू नये म्हणून शेतकरी बाजारात आंबा पाठवत आहेत..Hapus Mango Prices: आवक वाढताच हापूसचे दर गडगडले.‘वाढत्या आवकेमुळे बाजारात हापूसचे दर कमी झाले आहेत,’ असे कोकण हापूसचे प्रमुख अडतदार संदीप खैरे यांनी सांगितले. पुणे बाजार समितीमधील कोकण हापूस आंबा अडतदार करण जाधव म्हणाले, की सणाच्या काळात धार्मिक महत्त्वामुळे आंब्याची मागणी शिगेला पोहोचते. गुढीपाडव्यापासून सुरू झालेली खरेदी अक्षय तृतीयेपर्यंत कायम असते. यंदाही हीच परिस्थिती होती. .Hapus Mango Price: हापूस ५०० ते ७०० रुपये डझन.मात्र सण संपल्यानंतर मागणी कमी झाल्याने बाजारात पुरवठा-मागणीचा समतोल साधला गेला. परिणामी, किरकोळ बाजारात दरात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट झाली. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात हापूसची आवक कमी राहिल्याने दरात वाढ झाली होती..घाऊक बाजारातील भावतयार हापूस आंबा४ ते ७ डझन पेटी...२५०० ते ४०००कच्चा हापूस४ ते ७ डझन पेटी...१५०० ते २५००.हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन कमी आणि आवक घटल्याने हापूस महाग झाला होता. मात्र एप्रिलच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलली आहे. कोकणातून येणाऱ्या आवकेत वाढ झाली असून तयार आंब्याचे प्रमाण जास्त असल्याने बाजारात पुरवठा सुधारला आहे.- अरविंद मोरे, आंबा बागायतदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.