Ration Card : रेशन कार्डचे वाटप ऑनलाइन

Antyoday Yojana : राज्यात एकूण ५२ हजार ५३२ रास्तभाव दुकानदार आहेत. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो.
ration card
ration cardAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्हा धान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशनकार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच (आधार कार्डप्रमाणे) रेशनकार्ड मिळेल. रेशनकार्ड बंद झाले तरी पिवळे, केशरी कार्डधारकांना मिळणाऱ्या सुविधा सुरूच राहतील. मात्र, यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारखी दुरुस्तीची कामे ऑफलाइन पद्धतीनेच होतील.

जिल्ह्यात पिवळे, केशर व पांढरे (शुभ्र) रेशनकार्ड धारकांची एकूण संख्या १५ लाख ५८ हजार आहे. रास्त भाव दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरण केले जाते. राज्यात एकूण ५२ हजार ५३२ रास्तभाव दुकानदार आहेत. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो.

ration card
Ration Grain : केशरी कार्डधारक शेतकऱ्‍यांना सव्वा वर्षापासून मिळेना धान्य

पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना राज्य सरकारने उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली होती. त्यामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांत तब्बल १६ हजार रेशनकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

यात नाव समाविष्ट करणे, कमी करणे यांसारख्या कामांसाठी महिलांनी गर्दी केल्याने ऑनलाइन कार्ड वितरणाची केंद्रस्तरीय प्रणाली ‘आरसीएमएस’ बंद पडली होती. त्यामुळे जिल्हा कार्यालयास अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ration card
Ration Shop : रेशनसाठी नागरिकांची दिवसभर उपासमार

ऑनलाइन प्रणाली अधिक सक्षम झाल्यास नागरिकांना रेशनकार्ड संदर्भातील कामासाठी जिल्हा धान्य वितरण कार्यालयात येण्याची आवश्‍यकता भासणार नाही. ऑनलाइन अर्जाच्या आधारे आधारकार्डप्रमाणे स्वत: रेशनकार्डची प्रिंट काढता येईल. त्याचा अधिकृत वापर करता येणार आहे.

असा मिळतो योजनेचा लाभ

अंत्योदय कार्डधारक : शिधापत्रिका धारकांना महिन्याला एकूण ३५ किलो धान्य मिळते. यात गहू १५ किलो, तांदूळ २० किलो दिले जातात.

शिधापत्रिका धारकांची संख्या

पिवळे कार्ड

१) बीपीएल- ३,२३,७७८

२) अंत्योदय- १,७६,७४१

केशरी

-प्राधान्य कुटुंब- ३,५६,८१९

-बिगर प्राधान्य- ५,९६,६७७

शुभ्र (पांढरे)

१०४८२०

एकूण=१५,५८,८३५

ऑनलाइन रेशनकार्ड काढण्यासाठी वापरात रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) व्यवस्थितरीत्या चालत नसल्याने अडचणी येतात. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कळविले आहे. रेशनकार्डचे वाटप बंद झालेले असले तरी ऑनलाइन प्रक्रियेच्या आधारे लाभ दिले जात आहेत.
- गणेश जाधव, धान्य वितरण अधिकारी, नाशिक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com