Nashik News : सर्व प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत

पुरवठा विभागाने रेशन कार्डबाबत असलेल्या सर्व ऑनलाईन नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात.
Nashik News
Nashik NewsAgrowon

Nashik News : सुरगाणा तालुक्यात महसूल, वन व आदिवासी विभाग यांच्यासह अन्य विभागांनी सर्व प्रलंबित कामे येत्या १५ दिवसांत तत्काळ पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी सुरगाणा तालुक्यात शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.

त्यावेळी ते बोलत होते.याबैठकीस उपवनसंरक्षक पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवण उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार सचिन मुळीक, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Nashik News
Water Supply : मोखाड्यात २७ गावांना टॅंकरने पुरवठा

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सुरगाणा तालुक्यातील कामांचा आढावा घेताना सांगितले की, पुरवठा विभागाने रेशन कार्डबाबत असलेल्या सर्व ऑनलाईन नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात.

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यात ३ शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी या योजनांमधील नवीन प्रस्ताव मंजूर करून मंजूर असलेल्या प्रस्तावांच्या हफ्त्यांचे वितरण करावे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत पथदर्शी प्रकल्प म्हणून ५ प्रस्ताव सादर करण्यात यावेत.

त्याचप्रमाणे कानाशी येथे कळवण उपविभागीय अधिकारी यांच्या मदतीने उपकेंद्र सुरू करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Nashik News
Crop Bharpai : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शेतकरी अडचणीत; पंचनाम्याबाबत विरोधीपक्षाची तक्रार

बैठकीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी वनहक्क कायद्यासाठी दावेदारांची मागणी जाणून घेत सुरगाणा तालुक्यातील विविध भागांना भेटी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com