
Ahilyanagar News : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विविध मानाचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी पत्रकारितेसाठी या वर्षीपासून सुरू करण्यात आलेला ‘माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार’ ‘ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे.
‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात येत आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी ही माहिती दिली. प्रकारांसाठी काम करणाऱ्या व मात्र संस्था म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्काराने गौरव केला जातो.
कृषी पत्रकारितेसाठी यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला ‘माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार’ ‘ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना तसेच बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची निवड केली आहे. रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी मा. गो. वैद्य, दिनू रणदिवे, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी आदी ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत हा पुरस्कार वितरण होणार असल्याचे सांगण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, माजी अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, गणेश जेठे आदी उपस्थित होते.
जाहीर झालेले पुरस्कार
- माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार : बाळासाहेब पाटील (अॅग्रोवन, मुंबई)
- आचार्य अत्रे पुरस्कार : महेश म्हात्रे (मुंबई)
- शशिकांत सांडभोर पुरस्कार : अभिजित करांडे (मुंबई)
- प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार : अमेय तिरोडकर (मुंबई)
- भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कारः पांडुरंग पाटील (अंमळनेर, जळगाव)
- नागोजीराव दूधगावकर पुरस्कार : सर्वोत्तम गावरस्कर (बीड)
- दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार : दिनेश केळुसकर (संपादक, सकाळ गोवा)
- सावित्रीबाई फुले पत्रकारिता पुरस्कार : सीमा मराठे (सिंधुदुर्ग)
- संतोष पवार स्मृती पुरस्कार : भरत निगडे (पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.