Sangli APMC Election : सांगली जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव

सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli News : सांगलीसह जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा (Sangli Agriculture Produce Market Committee Election) धुरळा सुरू झाला आहे. बहुतांश ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशी सर्वपक्षीय पॅनेल होण्याची शक्यता आहे.

इच्छुकांची संख्या जादा असल्याने सर्वच लढती चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बाजार समितीत सत्ता कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आत्तापासूनच बेरजेची गणितांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

सांगली, तासगाव, पलूस, विटा, इस्लामपूर, शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांच्या निवडणूक होत आहे. या सात बाजार समित्यांसाठी २४ हजार ५२८ मतदार आहेत.

त्यामध्ये सांगली बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत ८ हजार ६७५ मतदार आहेत.

शिराळ्यात २ हजार ८८६ मतदार, आटपाडीत १ हजार ९९२, विट्यात ३ हजार १५९, पलूसमध्ये १ हजार १५८, इस्लामपूरमध्ये ४ हजार १७३९ तर तासगाव बाजार समितीचे १ हजार ९४९ मतदार आहेत.

Sangli APMC Election News
APMC Election : सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिका गुलदस्‍त्यात!

सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. या समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. सांगली बाजार समितीचे मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यात कार्यक्षेत्र आहे.

त्यामुळे सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते. या बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात.

गतवेळी काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार राजू शेट्टी यांचे एक तर विरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, माजी आमदार विलासराव जगताप, तसेच काँग्रेसचे माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली होती.

यंदाच्या निवडणुकीबाबत राजकीय नेत्यांकडून चर्चा सुरू झाली आहे. पॅनेलबाबत प्राथमिक बोलणी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.

याठिकाणी सत्तेत येण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात. तर संचालक होण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. निवडणूक लांबल्याने आता तर इच्छुकांची संख्या मोठी आहे.

Sangli APMC Election News
Nanded APMC Election : नांदेडसह पाच बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करणे : ता. २७ मार्च ते ३ एप्रिल

अर्जाची छाननी : ता. ५ एप्रिल

उमेदवार यादी प्रसद्धी : ता. ६ एप्रिल

अर्ज माघार : ता. ६ ते २० एप्रिल

अंतिम उमेदवार यादी प्रसिध्दी : ता. २१ एप्रिल

मतदान : ता. ३० एप्रिल

मतमोजणी : ता. ३० एप्रिल रोजी मतदान संपल्यानंतर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com