Turmeric Market: अकोला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामापासून हळदीचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. या नव्या सुविधेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या बाजारात हळदीला सरासरी १३,९०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे. बाजार समितीत हळदीला कमाल १५,५२५ रुपये, तर किमान ११,९०० रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला आहे..पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये मागील काही वर्षांपासून हळद लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. अकोला जिल्ह्यातही शेतकरी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून हळद पिकाकडे वळत आहेत. कमी जोखमीचे आणि तुलनेने चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून हळदीने शेतकऱ्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजारपेठेतील मागणी आणि मिळणाऱ्या दरामुळे हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली आहे..Turmeric Prices Drop: हळदीचे ‘पॅनिक सेंलिंग’ टाळण्याची गरज.जिल्ह्यातील वाढते लागवड क्षेत्र लक्षात घेऊन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने काही दिवसांपूर्वी हळदीचे खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी हिंगोली, वसमत यांसारख्या मोठ्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि इतर अडचणींचा सामना करावा लागत होता..Turmeric Farming: फिका रंग हळदीचा.आता अकोला बाजार समितीतच हळदीची खरेदी सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर विक्रीची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि वाहतूक खर्चात बचत होत असून, माल विक्रीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे..बाजार समितीने सुरू केलेल्या या उपक्रमाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील हंगामापासून हळदीची आवक वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात या बाजारपेठेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.