Rural Politics: अकोला जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागांसाठी आता राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. राजीनामा, निधन आणि अनर्हता अशा विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७६ ग्रामपंचायतींमधील १३ थेट सरपंच पदे आणि १२६ सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आजपासून ( ता. ७) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या घोषणेमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इच्छुकांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली आहे..जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींमधील १२६ सदस्य व १३ सरपंच अशा एकूण १३९ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला हाेता. त्यानुसार ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे, तर गरज असल्यास त्या ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान, तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे १३ ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन व्हावे व निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व यंत्रणांना दिले..Akola Politics: अकोल्यात शिवसेनेच्य ‘उबाठा’ गटाला खिंडार.थेट जनतेतून सरपंचतेल्हारा तालुक्यातील हिंगणी खु, अकोट तालुक्यातील धारगड, वडाळी सटवाई, धामणगाव, बांबर्डा, मूर्तिजापूर तालुक्यांतील वडगाव अकोला तालुक्यातील भौरद, सांगवी मोहाडी, बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा, जनुना, उजळेश्वर, पातूर तालुक्यांतील गोंधळवाडी, तुलंगा खु.अशा १३ सरपंचपदांचा पोटनिवडणुकीत समावेश आहे..District Bank Election Result: जिल्हा बँक निवडणुकीत ललित बहाळेंची बाजी ....असा आहे निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन दाखल करणे-७ एप्रिल ते १३ एप्रिलअर्जांची छाननी- १५ एप्रिल.उमेदवारी अर्ज माघारी घेणे-१७ एप्रिलनिवडणूक चिन्ह वाटप-१७ एप्रिलमतदान-२८ एप्रिलमतमोजणी-२९ एप्रिल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.