Farmer Demands: पीएम किसान सन्मान निधी योजनेचे रखडलेले हप्ते तातडीने वितरित करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रलंबित पीक विमा दावे मंजूर करावेत, खरीप हंगामापूर्वी खतटंचाई दूर करावी तसेच कथित बोगस पंचनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर आंदोलन करण्यात आले..अकोला जिल्ह्यातील शेतकरी विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असून अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप संघटनेने केला..Farmers Protest: शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत.आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. मुरलीधर इंगळे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. इंगळे यांनी स्पष्ट केले. .Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा.तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डीएपी खताचा पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. २०२३-२४ मधील पीक विमा लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आणि मागण्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले..यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, तालुकाध्यक्ष मंगेश गावंडे, पुर्णाजी खोडके, जिल्हा सचिव रमेश चिंचे, शेख मोसीन, केशव लढे, कमलेश गावंडे, राजू हिवरकर, कुशल नावकार, आकाश कंटाळे, अबजल खान, सुनील मनवर, तौफीक पटेल, करीम खान यांच्यासहमोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.