Panchayat Samiti : ‘यशवंत’मध्ये अक्कलकोट पंचायत समिती पुणे विभागात प्रथम

Yashwant Panchayat Raj Abhiyan : प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थाना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला.
Yashwant Panchayat Raj Abhiyan
Yashwant Panchayat Raj AbhiyanAgrowon

Solapur News : प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थाना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला. ११ लाख रुपयांचा धनादेश व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे विधान भवन सेंन्ट्रल हॉल याठिकाणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पार पडला.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांचे मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे व श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनात पंचायत समितीने मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज केले. तत्कालीन सीईओ पी. टी. वायचळ यांनी गुणवंत अधिकारी यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते.

Yashwant Panchayat Raj Abhiyan
Water Scarcity : जालना जिल्ह्यात १७२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू

अक्कलकोट पंचायत समितीच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी गुणवंत अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप तर गुणवंत कर्मचारी म्हणून कनिष्ठ सहाय्यक महेश शेंडे कुर्डूवाडी यांचा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करणेत आला.

यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराज, उपायुक्त (विकास) विजय मुळीक, उपयुक्त आस्थापना राहुल साकोरे, विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन आदी उपस्थित होते.

Yashwant Panchayat Raj Abhiyan
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन लाख हेक्टरवर रब्बी पिके

सन २००५–२००६ या आर्थिक वर्षापासून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विभाग व राज्य स्तरावर राज्यातील पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

यामध्ये मागील वर्षामध्ये लोकहितासाठी केलेली विकास कामे, प्रशासकीय कामकाज, आस्थापनाविषयक कामकाज, केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मूल्यांकन विभागीय स्तरावरून व राज्य स्तरावरून तपासणी केली जाते. सदरील तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com