Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) आज (ता.१०) प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करून राजीनाम्याची मागणी केल्याने पक्षाने ठोंबरे यांना नोटीस दिली होती, मात्र सात दिवसांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच हा मोठा निर्णय घेण्यात आला. .पक्षाने जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांचे नाव गायब असून, अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक आदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेऊन पुरावे सादर केल्यानंतरही ठोंबरे यांची पदच्युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे..Santosh Deshmukh Murder Case : बीड संरपंच हत्या प्रकरण : धक्कादायक दावा करणाऱ्या दमानियांसह ठोंबरेंच्या अडचणी वाढ?.रुपाली ठोंबरेंना नोटीस दिल्यानंतर स्पष्टीकरणासाठी सात दिवस पूर्ण होण्याची वाट न पाहता पक्षाने तातडीने हा निर्णय घेतला. त्यांना प्रवक्तेपदावरून थेट काढून टाकण्यात आले आहे. पक्षाने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून, त्यात ठोंबरे यांचे नाव गायब आहे. एवढेच नव्हे तर, माजी प्रवक्ते अमोल मिटकरी यांनाही पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. त्यांचेही नाव नव्या यादीत समाविष्ट नाही. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दिसते..पक्षाने जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे आणि सायली दळवी यांसारख्या नव्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. याशिवाय रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सूरज चव्हाण, विकास पासलकर आणि श्याम सनेर या नेत्यांचा समावेश आहे..Ajit Pawar Karjmafi: कर्जमाफीच्या अंमलबजावणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान काय?.दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी या निर्णयापूर्वी अवघ्या दोन दिवसांआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडल्याचे सांगितले होते. तसेच, आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ काही पुरावेही दाखवल्याचे त्यांनी नमूद केले होते..मात्र, भेटीनंतर लगेचच प्रवक्तेपद गमावल्याने ठोंबरे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे. पक्ष सोडणे किंवा इतर पर्याय शोधणे, अशा गोष्टींबाबत आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.