NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाची ३८ जणांची पहिली यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पहिली यादी ३८ जणांची जाहीर झाली आहे. तसेच अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटवापरून महायुती आणि महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे. यादरम्यान भाजपने ९९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) देखील ४५ उमेदवारांची दुसरी यादी समोर आली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ३८ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात अजित पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची नावे आहेत. तर अजित पवार बारामतीतूनच निवडणूक लढणार असल्याचेही उघड झाले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, मनसे यांच्यासह तिसरी आघाडी आणि इतर पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर केल्या आहेत. पण महायुतीतील अजित पवार गट उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. यादरम्यान बुधवारी (ता.२३) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिली यादी जाहीर केली.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार बारामतीतून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

लाडक्या बहिणींना संधी

दरम्यान अजित पवार गटाकडून १८ जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. तर यावेळी तटकरे यांनी अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचे सांगितले. तसेच येवल्यातून छगन भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यात आली आहे. तसेच लाडक्या बहिणींना देखील खूश करताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने श्रीवर्धन येथून अदिती तटकरे, राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना अर्जुनी मोरगाव येथून उमेदवारी दिली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर नको; अजित पवारांकडून साखर कारखानदारांना सूचना

बारामतीमध्ये काका-पुतण्या लढत?

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बारामतीमधून लढणार की दुसरा पर्याय शोधणार याकडे अनेकांचे लक्ष लागलं होते. पण आता अजित पवार बारामतीमधून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. तर शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना एबी फ्रॉमही दिल्याचे बोलले जात आहे. जर युगेंद्र पवार मैदानात उतरले तर येथे राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी आणि काका विरूद्ध पुतण्या अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी

अजित पवार (बारामती), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), हसन मुश्रीफ (कागल), धनंजय मुंडे (परळी), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), आदिती तटकरे (श्रीवर्धन), अनिल पाटील (अंमळनेर), संजय बनसोडे (उदगीर), राजकुमार बडोले (अर्जुनी मोरगाव), प्रकाश दादा सोळंके (माजलगाव), मकरंद पाटील (वाई), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दिलीप मोहिते (खेड आळंदी), संग्राम जगताप (अहमदनगर शहर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), दौलत दरोडा (शहापूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), नितीन पवार (कळवण), आशुतोष काळे (कोपरगाव), किरण लहामटे (अकोले), चंद्रकांत नवघरे (वसमत), शेखर निकम (चिपळूण), सुनील शेळके (मावळ), अतुले बेनके (जुन्नर), यशवंत विठ्ठल माने (मोहोळ), चेतन तुपे (हडपसर), सरोज अहिरे (देवळाली), राजेश पाटील (चंदगड), हिरामण खोसकर (इगतपुरी), राजू कोरमेर (तुमसर), इंद्रनील नाईक (पुसद), सुलभा खोडके (अमरावती शहर), भरत गावित (नवापूर), निर्माला उत्तमराव विटेकर (पाथरी) आणि मुंब्रा कळवा येथून नजीब मुल्ला यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com