Parali-Vaijnath Development : निधी कमी पडू देणार नाही, मात्र कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावी

Ajit Pawar News : श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
AJit Pawar
AJit PawarAgrowon
Published on
Updated on

Beed News : श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सोमवारी (ता. १९) परळी येथे प्रभू वैद्यनाथचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात त्यांनी श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंढे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

AJit Pawar
Ajit Pawar: निविदा फुगविल्यास ईडी-सीबीआयकडे तक्रार

जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ९२ कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात २८६.६८ कोटीच्या विविध ९२ कामांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

दर्शन मंडपाचे काम, परिसर सुधारणा, मंदिरा भोवती दगडी फरशी, वास्तुशिल्प प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, सौर दिवे बसविणे, उद्यान विकसित करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम, वाहनतळ यासह सुरू असलेल्या विकास कामांबाबत कृष्णकुमार बांगड यांनी माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, की श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ हे बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक आहे. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे.

AJit Pawar
Ajit Pawar : ‘संपूर्ण वन’ उपक्रमाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

मंदिर परिसरातील स्वच्छता, निटनेटके पणा, सर्व सोई सुविधांयुक्त दर्शन मंडप, तसेच तीर्थक्षेत्र बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोईसुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.

लेझर शो करताना किती वेळ शो असेल, त्यामध्ये भाविकांना कोणत्या बाबी दाखविल्या जातील यासह देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा दर्जेदार असायला हव्यात, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी विकसित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com