Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूमुळे गुरुवारी (ता.२९) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. बाजार समित्या बंद असल्याने शेतीमालाची आवक ठप्प झाली होती. काही बाजार समित्यांमध्ये तुरळक आवक झाली. यामुळे या शेतीमालाची लगेचच विक्री करण्यात आली. तसेच पुण्यासह काही शहरात बंद पाळण्यात आला..राज्यातील बाजार समित्यांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड लातूर, परभणी, सोलापूर या प्रमुख बाजार समित्यांनी आणि विविध कामगार संघटनांनी बाजार बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात आणला नाही..Ajit Pawar Funeral: शोकाकुल वातावरणात दादांना अखेरचा निरोप.नाशिक बाजार समिती बंद राहणार असल्याचा संदेश ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे काही शेतकरी शेतीमाल घेऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर दाखल झाले होते.लिलाव बंद असल्याने आणि माल परत नेणे परवडणारे नसल्याने, या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि इतर शेतीमाल प्रवेशद्वारावरच किरकोळ ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना विकला. व्यवहार बंद असल्याने भाजीपाल्याची आवक ठप्प झाल्याने मुंबई आणि गुजरातकडे होणारा पुरवठादेखील विस्कळीत झाला होता..Ajit Pawar Plane Crash: कसा झाला विमानाचा अपघात ?.नाशिकसह जिल्ह्यातील सिन्नर, देवळा, उमराणे, कळवण, मालेगाव बाजार समित्यांच्या मुख्य व उपबाजार आवारावर गुरुवारी कामकाज बंद होते. येवला बाजार समितीत गुरुवारी अर्धा दिवस बंद ठेवून दुपारनंतर शेतीमालाचे लिलाव करण्यात आले. लासलगाव, सटाणा, नामपूर, मनमाड, बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २८) दुपारनंतर व्यवहार बंद होते. तर गुरुवारी व्यवहार सुरू होते..पुणे बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला, गूळ भुसार बाजार बंद असल्याने शुकशुकाट होता. तर जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, खेड, आंबेगाव बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मंचर बाजार समितीमध्ये सायंकाळी स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.