Mumbai News: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी मंगळवारी (ता. १७) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यासंदर्भातील निवेदन या वेळी मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले..या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.’’.Ajit Pawar: द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडविणारा लोकनेता हरपला.श्री तटकरे म्हणाले, ‘‘या मागणीस मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत आज (ता. १८) केंद्रीय गृहमंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत..Ajit Pawar Plane Crash Probe: 'हा घातपात असू शकतो?'; अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांना शंका.पण सीबीआय तपास करत असताना व्यापकतेने तपास होऊ शकतो. ज्यावेळी स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळी बाह्य देशातील यंत्रणाही तपास करत असतात. याचा तपास व्हावा आणि निष्कर्ष जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादीची भूमिका आहे.’’.विमान दुर्घटनेबाबत निवेदनात मांडलेले मुद्दे...उड्डाण क्रू रचनेत शेवटच्या क्षणी झालेल्या बदलासंबंधी अधिक तपास करण्याची आवश्यकताहवाई वाहतूक नियंत्रण संप्रेषण, धावपट्टीच्या मंजुरीच्या क्रमवारीशी स्पष्ट विसंगतीगंभीर ऑनबोर्ड सुरक्षा चेतावणी प्रणालींच्या कार्यप्रणाली आणि अखंडतेबद्दल चिंता लँडिंग टप्प्याच्या जवळ असूनही कोणत्याही रेकॉर्ड केलेल्या संकट संप्रेषणांची अनुपस्थिती. क्रू फिटनेस,अनुपालन, विमान प्रणालींसह फॉरेन्सिक मूल्यांकनांसंदर्भातील बाबी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.