Agriculture
Agriculture Agrowon

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

Agriculture News : कृषी महाविद्यालय नागपूरमधून शिक्षण घेत नोकरीवर लागत त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटी ही संस्था सेवाभावी उपक्रम राबविते.
Published on

Nagpur News : कृषी महाविद्यालय नागपूरमधून शिक्षण घेत नोकरीवर लागत त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटी ही संस्था सेवाभावी उपक्रम राबविते. या संस्थेच्या वतीने निराधार मनोरुग्णाच्या उत्कर्षाकरिता कार्यरत मानव विकास संस्थेला साहित्याच्या माध्यमातून मदत देण्यात आली.

ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटी ही कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन, शैक्षणिक संस्था, महसूल, विधी, बॅंक, पोलिस, आकाशवाणी, दूरदर्शन, सहकार, जिल्हा परिषदेसह विविध विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांची संस्था आहे. नागपूर कृषी महाविद्यलायातून शिक्षण घेऊन नोकरीअंती सेवानिवृत्त झालेल्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.

या संस्थेच्या माध्यमातून विविध सामजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार मनोरुग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या अनेकांना समाज आणि कुटुंबीय नाकारतात. अशांचा सांभाळ करण्यासाठी काटोल (नागपूर) येथील मानव विकास बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे.

Agriculture
Agriculture Department : कृषी सेवक कालावधी रद्द करा

ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटीच्या वतीने मानव विकास संस्थेला यापूर्वी मनोरंजनासाठी टीव्ही भेट देण्यात आला होता. त्यानंतर या संस्थेतील आश्रीतांना त्यांचे साहित्य ठेवता यावे याकरीता साहित्य पेट्यांची भेट दिली गेली. विष्णूजी की रसोई या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील १२ कृषी तज्ज्ञांचा सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला.

Agriculture
Agriculture Department : कृषी संचालकपदांची पात्रता घटविली

या वेळी प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव विजय तपाडकर यांनी संस्थेद्वारा राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कृषी महाविद्यालय नागपूरच्या माजी विद्यार्थ्यांचे महासंमेलन घेण्याचे देखील प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन राजेश कळमकर यांनी केले. विजय गोलीवार यांनी आभार मानले.

आत्महत्याग्रस्त शेतकरी, मजूर यांच्या परिवारास तसेच ग्रामीण भागातील निराधार, गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजीक उत्कर्षासाठी आर्थिक व शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मदत करणे असा संस्थेचा उद्देश आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी संस्थेने नुकतीच केली आहे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारस्तरावर पाठपुरावा करण्याचे प्रस्तावित आहे.
- डॉ. शिवाजी सरोदे, अध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com