Ai in Agriculture: शेतीसाठी ‘एआय’ अत्यंत उपकारक; ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचे प्रतिपादन
Sakal Chairman Prataprao Pawar: देशातील शेतीच्या दृष्टीने एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान अत्यंत उपकारक असून, अनेक देशांनी या प्रणालीचा वापर करून शेतीत आमूलाग्र सुधारणा केली आहे. आपल्या शेतकऱ्यांनीही या प्रणालीचा व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये आवर्जून करावा, असे आवाहन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे केले.