

Nagar News : अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.३१) केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित चौंडी येथील सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हयाला अहिल्यादेवी होळकरांचं नावं दिलं पाहिजे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगरचं नामांतर करण्याची घोषणा भाषणात केली.
आपल्या राज्याचा मुख्यमंत्रीच छत्रपतींचा मावळा म्हणूनच अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणारच आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केलं. तर उस्मानाबादचं नाव धाराशीव केलं. त्यामुळे आता अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करायला दरवर्षी चौंडी येथे हजर होतो.
यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे, भाजपचे गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.