Fake Dairy Products: जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला चार महिन्यांनंतर पुन्हा वेग आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या दोन दिवसांत राहुरी, नगर, पारनेर आणि श्रीरामपूर परिसरातील सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बहुचर्चित बनावट दूध प्रकरणाचा तपास पुन्हा चर्चेत आला आहे..फक्राबाद (ता. जामखेड) येथे १४ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत बनावट दूध निर्मितीचा प्रकार उघडकीस आणला होता. तपासात पॅराफिन ऑईल, विविध रसायने आणि दूध फ्लेवर पावडर यांच्या मिश्रणातून मानवी आरोग्यास अपायकारक द्रावण तयार करून त्यापासून कृत्रिम दूध बनविले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान ४१ संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात सुमारे ८५० पानी दोषारोपपत्र जामखेड न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चौघांना जामीन मिळाला असून तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत..Milk Adulteration Action: दूध भेसळविरोधी कारवाईला शेतकऱ्यांचा पाठिंबा.नव्या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे. अद्याप २७ संशयित फरार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे सोपविल्यानंतर तपासाला पुन्हा गती मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांत बनावट दूध रॅकेटशी संबंधित सात जणांना ताब्यात घेण्यात आल्याने चार महिन्यांपासून रखडलेले प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. तपासातील या हालचालींमुळे रॅकेटमधील इतर संशयितांमध्येही खळबळ उडाली आहे..Fake Seeds Karvai: सात लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे जप्त.कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चाफक्राबाद येथील बनावट दूध प्रकरणात मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री होत असल्याचे उघडकीस आल्यानंतरही तपासाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. चार महिन्यांपर्यंत तपास रखडल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. .आता तपासाला नव्याने वेग मिळाल्यामुळे बनावट दूध रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वी तपास का रखडला, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. तसेच जिल्ह्यात बनावट दूध आणि दूध भेसळ प्रकरणांकडे अन्न व औषध प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.