Nominated Members: राज्य शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित सदस्य, तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची घोषणा केली आहे. विधानमंडळाच्या दोन जागांवर आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ यांच्यासह वीस जणांची निवड करण्यात आली आहे. नियुक्ती झालेल्या सदस्यांपैकी बहुतांश जण भाजपशी संबंधित आहेत..याबाबत सोमवारी (ता. ६) शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनाच्या विविध विषयांतील अनुभव व सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये विधिमंडळाच्या दोन जागांवर आमदार लंघे, खताळ यांचा समावेश आहे..District Planning Committee: पालकमंत्र्यांअभावी नियोजन समिती ठप्प.जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये विनायक देशमुख (रा. बुऱ्हाणनगर, ता. जि. नगर), अजय काशीद (रा. सारोळा, ता. जामखेड), बापूसाहेब पाटेकर (रा. ढोरजळगाव, ता. शेवगाव), अनिता जगताप (रा. शिर्डी, ता. राहाता) यांचा समावेश आहे. जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या विशेष निमंत्रितांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले (रा. खंडाळा, ता. जि. नगर),.District Planning Committee: वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा.सचिन रोहमारे (रा. पोहेगाव, ता. कोपरगाव), चंद्रशेखर खरमारे (रा. कोंभळी, ता. कर्जत), अंकुश कासोळे (रा. भालगाव, ता. पाथर्डी), गणपतराव काकडे (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा), विठ्ठल घोरपडे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर), संध्या सोनवणे (रा. संताजीनगर, ता. जामखेड), प्रभाकर शिंदे (रा. खुपटी, ता. नेवासे), .अनिल करांडे (रा. दरेवाडी, ता. जि. नगर), अनिल आढाव (रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी), डॉ. अविनाश कानवडे (रा. अकोले), विकास वाकचौरे (रा. मळई, सुगाव बुद्रुक, अकोले), अश्विनी थोरात (रा. पिंपळी गवळी, ता. पारनेर), अभिजित खोसे (अहिल्यानगर शहर) यांचा समावे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.