
Ahilyanagar Rain : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, नेवासे, श्रीगोंदे आणि नगर तालुक्यांतील काही गावांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. सोमवारी (ता. ५) पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वनकुटे, वडगाव सावळाला, ढवळपुरी भागात गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तास झालेल्या या पावसामुळे आंबा, संत्रा, पपई या फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या भागात अवकाळी पाऊस झाला. वनकुटे परिसरातील गावांमध्ये सर्वाधिक अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह या भागात गारा पडल्या. या भागातील आंबा, संत्रा, पपई, कलिंगड, खरबूज आदींसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कांदा, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी या परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, वाघाचा आखाडा या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
नेवासे तालुक्यातील सोनई परिसरात ही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. नगर तालुक्यातील हिवरेझरे परिसरात पाऊस झाला. अहिल्यानगर शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील चिंता येथे २३, भानगाव व आढळगाव येथे प्रत्येकी १०, खर्डा १४, नायगाव येथे १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.