Agrowon Kharof Yojana : ‘ॲग्रोवन’ सुवर्ण खरीप बक्षीस योजना जाहीर

Kharif Season : शेतकऱ्यांना यंदाचा खरीप सुवर्णमय व्हावा यासाठी दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन सुवर्ण खरीप बक्षीस योजना २०२४’ जाहीर केली आहे.
Agrowon Kharif Scheme
Agrowon Kharif Scheme Agrowon
Published on
Updated on

Pune News : शेतकऱ्यांना यंदाचा खरीप सुवर्णमय व्हावा यासाठी दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने ‘ॲग्रोवन सुवर्ण खरीप बक्षीस योजना २०२४’ जाहीर केली आहे. या योजनेत १०० प्रश्‍नोत्तरे आधारित कूपन असणार असून, ७० लाखांची सुमारे ३७००हून अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

यामध्ये दोन स्पेंडर दुचाकींचे बंपर बक्षीस असून, सोन्याची नाणी, टीव्ही, सायकल, पैठणी, स्प्रे पंप, बॅटरी, सॅक आदी विविध बक्षिसांचा समावेश आहे. या योजनेत अधिकाधिक वाचकांनी सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Agrowon Kharif Scheme
Kharif Season : केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांनी घेतला खरिपाच्या तयारीचा आढावा

...अशी आहे योजना

- स्पर्धा कालावधी : २० जून २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४

- असे व्हा सहभागी : ॲग्रोवनमध्ये दररोज प्रसिद्ध होणाऱ्या खरीप लेखावर विचारलेल्या प्रश्‍नाचे अचूक उत्तर अंकात त्याच दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या कूपनमध्ये लिहायचे आहे.

- एकूण कूपन : १०० (आवश्‍यक ९० कूपन)

- प्रवेशिका : सर्व कूपन (आवश्‍यक ९०) ‘ॲग्रोवन’ आणि ‘सकाळ’ दैनिकांमध्ये २७ जून २०२४ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रवेशिकेत चिकटवून बक्षीस योजना संपल्यानंतर ॲग्रोवनच्या कार्यालयाला पाठवायची आहेत.

- येथे नोंदवा अंक : सर्व वाचकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे आजच आपल्या अंकाची मागणी करावी.

- अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१५९८८१५

Agrowon Kharif Scheme
Kharif Season: खरीप आढावा बैठकीला अजूनही मुहूर्त नाही

...अशी असणार बक्षिसे

दोन स्पेंडर दुचाकी, १३ टीव्ही, २५ सायकली, १०१ पैठण्या, ५०१ शेती स्‍प्रे पंप, ५०१ बॅटरी, २ हजार ५५५ सॅक

‘‘मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. बारा वर्षांपासून मी ॲग्रोवन पेपरचे नियमित वाचन करतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या यशोगाथा, बियाण्यांची निवड, पिकांची निवड अशा वेगवेगळ्या स्वरूपांची माहिती शेतकऱ्यांना मिळते. यापूर्वीच्या कृषी समृद्धी बक्षीस योजनेत सहभाग घेऊन त्यामध्ये मला सायकल हे बक्षीस मिळाले. दोन मुलांपैकी मोठ्या मुलांसाठी सायकल घेण्याचे स्वप्न या ॲग्रोवनच्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाले. ॲग्रोवनच्या अशा योजनेतून शेतकऱ्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन मिळते.’’
- संदीप बंड, रा. सस्ती, ता.जि. अकोला
माझ्या अडीच एकर बागायती शेतीत भाजीपाला व उसाचे उत्पादन मी घेतो. आठ वर्षांपासून नियमित ॲग्रोवन पेपरचे वाचन करतो. त्यामध्ये मला आधुनिक शेतीविषयक माहितीचा उपयोग होतो. शेतीतील अर्थकरणाविषयी माहिती मिळते. अर्धा एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली. नांदेड-नाळेश्‍वर रोडवर शिवतीर्थ रसवंती चालवतो. यातून चांगले उत्पन्न घेतले. गेल्या वेळेस ॲग्रोवन कृषी समृद्धी बक्षीस योजनेमध्ये मला दुसऱ्या क्रमांकाचे पॉवर वीडर हे बक्षीस स्वरूपात मिळाले. त्याचा फायदा मला माझ्या भाजीपाला शेतीमध्ये होत आहे.
- नागोराव कोंडिबा गुब्रे, सुगाव बु, ता.जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com