
Agroown Farmers Training : ‘अॅग्रोवन’तर्फे २७ मे ते २ जून या कालावधीत व्हिएतनामचा कृषी अभ्यास व स्थलदर्शन दौरा आयोजित करण्यात आला आहे. व्हिएतनामने निर्यातीच्या क्षेत्रात घेतलेली झेप व प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्र यांचा अभ्यास करण्याची संधी शेतकरी, उद्योजक, तरुण व्यावसायिक, विद्यार्थी, अभ्यासक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी यांना या दौऱ्यात मिळणार आहे.
शेतीमाल निर्यात किंवा प्रक्रिया क्षेत्रात नवा व्यवसाय सुरू करण्याची किंवा सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. त्यामुळे ‘अॅग्रोवन’ने विदेश अभ्यास दौऱ्याचा उपक्रम सुरू केला. त्यानुसार दुबई यथे आयोजित करण्यात आलेले दोन दौरे अत्यंत यशस्वी ठरले. त्याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून व्हिएतनाम दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हिएतनाम हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश असून काळी मिरी, काजू, कॉफी, रबर, मासे यांचे उत्पादन वाढवून जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची किमया या देशाने केली आहे. तेथील शेतकऱ्यांनी गुणवत्तेच्या जोरावर मसाले, फ्रोजन भाजीपाला, फळे, व्हॅक्युम स्नॅक्स, फ्रूटपल्प, फ्रोझन व्हेज प्रॉडक्ट्स यांची निर्यात कशी वाढवली, तसेच ड्रॅगन फ्रूट, सुकवलेले मसाले आणि फळांचे अर्क यांच्या निर्यात व प्रक्रियेच्या क्षेत्रात जगभरातील बाजारपेठांमध्ये कसा दबदबा निर्माण केला हे या दौऱ्यात समजून घेता येणार आहे.
व्हिएतनाममधील फळे व भाजीपाला प्रक्रिया केंद्र, व्हॅक्युम फ्राइड स्नॅक्स फॅसिलिटी युनिट, ज्यूस-पल्प एक्स्ट्रॅक्शन युनिट, भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, सेंद्रिय भात शेती, यांत्रिक शेती, सिंचन व मृदा व्यवस्थापन युनिट्सना या दौऱ्यात भेटी देण्याचे नियोजन आहे. तसेच तेथील व्यापारी, उद्योजक तसेच आयात-निर्यात क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.
शेतीमाल निर्यातदार, तज्ज्ञ आणि प्रशिक्षक धनश्री शुक्ल या दौऱ्यातील सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. या दौऱ्यात व्हिएतनाममधील केवळ शेतीच नव्हे; तर पर्यटन, इतिहास, संस्कृती, निसर्ग, खाद्यसंस्कृतीचे दर्शन होणार आहे.
सहा रात्री व सात दिवस चालणाऱ्या या दौऱ्याचे एकूण मूळ शुल्क प्रति व्यक्ती १,२८,५०० रुपये + जीएसटी असून त्यात सर्व खर्च समाविष्ट आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंक या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांना अटीशर्तींसह मूळ शुल्कात ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साह्य करणार आहे.
मात्र ही सवलत मोजक्या शेतकऱ्यांसाठीच असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असल्याने दौऱ्यासाठी लवकर नोंदणी करणाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या दौऱ्यासाठी सहा महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट आवश्यक आहे. सहभागासाठी खाली नमूद केलेल्या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी २८ एप्रिलपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत समवेतचा क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी.
—--------
अधिक माहितीसाठी संपर्क ः गजानन शिंदे (९५४५५४१९१७), गणेश मोरे (७७७३९९९८६४)
राज्यातील शेतकऱ्यांनी जागतिक दर्जाचे कृषी तंत्रज्ञान बघावे व त्यातून स्वतः प्रयोगशील होत पुढे जावे ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादनाची गुणवत्तापूर्ण शेती वाढावी व प्रक्रियेला चालना मिळावी हा हेतू आहे. त्यासाठी ‘अॅग्रोवन’च्या व्हिएतनाम शेतकरी अभ्यास दौऱ्याला हातभार लावताना एक पुण्याचे काम केल्याची माझी भावना आहे.
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.