Dhananjay Munde : ‘ॲग्रोवन’शी माझे भावनिक नाते

Agrowon Diwali Ank : ‘ॲग्रोवन’ या दैनिकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवले आणि शेती पत्रकारितेत एक मानदंड तयार केलाय. अशा दैनिकाने १८ वर्षे पूर्ण केली.
Dhananjay Munde
Dhananjay MundeAgrowon

धनंजय मुंडे (कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य)

‘ॲग्रोवन’ या दैनिकाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक बदल घडवले आणि शेती पत्रकारितेत एक मानदंड तयार केलाय. अशा दैनिकाने १८ वर्षे पूर्ण केली. हा एक मैलाचा दगड आहे. यंदाच्या दिवाळी अंकासाठी त्यानिमित्ताने सिंहावलोकनाचा केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. यात आत्मप्रौढी नाही तर आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याचीही चाचपणी करण्याचा हा प्रयत्न आहे.

‘ॲग्रोवन’शी माझा भावनिक धागा गुंतलेला आहे. या दैनिकाची आणि माझी ओळख वडिलांमुळे झाली. माझ्या वडिलाच्या जीवनात या वृत्तपत्राचे वेगळे महत्त्व होते. ते सकाळी उठले, की त्यांच्या समोर या दैनिकाचा अंक असायचा. सकाळी उठले की वैद्यनाथ कारखान्याच्या आणि आजूबाजूच्या कारखान्यांच्या क्रशिंगची आकडेवारी आणि हंगाम नसेल, तर अन्य काय कामे सुरू आहेत याची इत्थंभूत माहिती त्यांना हवी असायची.

Dhananjay Munde
Jaggery Rate : यंदाच्या हंगामात गुळाला विक्रमी दर, क्विंटलला ११ हजारांचा सौदा

त्या सोबत चहा घेत ते ॲग्रोवन वाचून काढत असत. हे सगळं सुरू असताना त्यांच्या अवतीभवती माणसांचा गराडा असायचा. या गराड्यात आणि गोंधळातही ते इतकं मन लावून काय वाचतात याचे मला आश्‍चर्य वाटायचे. माझ्या वडिलांचा दिवस या वृत्तपत्रासोबत सुरू व्हायचा हे माझ्या मनावर ठसले. ते नेमके काय वाचतात हे पाहण्यासाठी मी हे वृत्तपत्र वाचू लागलो.

‘ॲग्रोवन’ने आजपर्यंत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. मी विधान परिषदेत विरोधी पक्षनेता असताना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा उभा करण्यासाठी, सभागृहात काही प्रश्‍न उपस्थित करायचे असतील तेव्हा मी या वृत्तपत्रातील संदर्भांशिवाय पुढे जात नव्हतो. शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रखरपणाने मांडण्यासाठी, जो काही संघर्ष केला त्यासाठी या संदर्भांचा खूप फायदा झाला. शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही.

Dhananjay Munde
Chandrashekhar Bhadsawale : जगभर पोहोचले ‘एसआरटी’ तंत्र

मी विधिमंडळात जे प्रश्‍न मांडले ते पूर्ण सुटले असे नाही, त्यामुळे संघर्ष यशस्वी झाला असे म्हणणार नाही. हा संघर्ष कधी संपेल हे मला सांगता येणार नाही. पण निश्‍चितच या संघर्षातील एक धागा म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मी काम केले त्यात या वृत्तपत्राचा वाटा मोठा आहे.

मी अभ्यासूपणे सभागृहात आणि सभागृहाबाहेर बोलतो त्यावरून शेतकऱ्यांना वाटते की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. हा विश्‍वास निर्माण करण्यात या वृत्तपत्राचा मोठा वाटा आहे. या वृत्तपत्रात मांडण्यात आलेले प्रश्‍न, मुद्दे मी सभागृहात उपस्थित करायचो. त्यातून महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला वाचा फुटत होती.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com