Sangali News: शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, प्रगत बियाणे, खते-कीटकनाशके आणि कृषिपूरक उद्योगातील नवीन संधी यांची माहिती एकाच छताखाली देणाऱ्या अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या भव्य प्रदर्शनाचा सोमवारी (ता. १) समारोप होत असून, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आज शेवटची संधी आहे. .विश्रामबाग येथील विलिंग्डन कॉलेजच्या मैदानावर हे प्रदर्शन भरले आहे. ‘कन्हैय्या अॅग्रो’प्रस्तुत ‘अॅग्रोवन अॅग्री एक्स्पो-२०२५’ पाॅवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स, विटा, बी. जी. चितळे डेअरी, भिलवडी व निसर्ग क्रॉप केअर इंडिया प्रा. लि. तासगाव, तर सहप्रायोजक वर्षा अॅग्रो इंड्रस्टीज, तासगाव, आयडियल अॅग्री सर्च, सांगली, माधुरी सोलर, वारणा दूध संघ, वारणानगर, कारगिल अॅनिमल न्यूट्रिशन अॅन्ड हेल्थ, बॅंकिंग पार्टनर स्टेट बॅंक ऑफ इंडिया आहेत..Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन.प्रदर्शनस्थळी सकाळपासूनच शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. रविवारची सुट्टी असल्यामुळे शहरी ग्राहकांनीही प्रतिसाद प्रदर्शनाला दिला. शेतकरी, कृषी विद्यार्थी, संशोधक, तरुण उद्योजक यांची मोठी वर्दळ प्रदर्शनात झाली. अनेकजण सहकुटुंब प्रदर्शनात आले होते. त्यात त्यांचा विशेषकरून कृषिपूरक, प्रक्रिया तसेच घरगुती स्वरूपात लघू उद्योगाची माहिती घेण्याकडे कल होता. अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या शेतीत काही प्रयोग करता येतील, अशा अनेक नवकल्पना जाणून घेतल्या. पीक व्यवस्थापन, यांत्रिकीकरणाचे महत्त्व, हवामान बदलाचे परिणाम, प्रक्रिया उद्योग अशा अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये शेतकऱ्यांनी घेतली. या प्रदर्शनाने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या शाश्वत शेती प्रवासातील हे प्रदर्शन एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रदर्शनात प्रवेश खुला असणार आहे..एकाच छताखाली अत्याधुनिक शेतीची माहितीकृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी एआय-आधारित तंत्रज्ञान, जलसंधारणातील नवी तंत्रे, सेंद्रिय शेतीविषयीची माहिती, बागायती पिकांची आधुनिक लागवड पद्धती, तसंच ब्लोअर, ट्रॅक्टर्स, पाण्याची बचत करणाऱ्या सेन्सर-आधारित प्रणाली, सुधारित बियाणे, शाश्वत शेतीसाठी उपाय, पशुखाद्य आणि दुग्ध उत्पादने यांची माहिती घेतली. तसेच तरुणांसाठी कृषी उद्योजकतेच्या दृष्टीने अनेक नवतंत्रज्ञानाची मेजवानी प्रदर्शनाने दिली, या सगळ्याचा एकाच छताखाली समृद्ध अनुभव शेतकऱ्यांनी घेतला..Agrowon Agri Expo: आधुनिक शेतीतल्या नव्या संधींसाठी ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन.कृषी कंपन्यांकडून खास सवलतीशेतीमध्ये उपयोगी पडणाऱ्या मशागतीच्या अगदी छोट्या-छोट्या अवजारांपासून ट्रॅक्टर, ब्लोअरसह अनेक कृषी उत्पादने तयार करणाऱ्या कृषी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांवर खास कृषी प्रदर्शनासाठी १० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांना अगदी परवडणाऱ्या दरात ही उत्पादने खरेदी करण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे..वासुदेवांकडून प्रबोधन, पोस्टमनकडून मार्गदर्शन‘कन्हैय्या अॅग्रो’ यांच्याकडून परंपरेशी नातं जपताना वासुदेव आणि पोस्टमन या लोककलाकारांच्या माध्यमातून प्रदर्शनात थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत दूध व्यवसाय, पशुखाद्य आणि ‘अॅग्रोवन’ची माहिती पोहोचवली जात आहे. कृषी प्रदर्शनात हे कलाकार आकर्षक पद्धतीने येणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. वासुदेव आपल्या पारंपरिक शैलीत संदेश देतात, तर पोस्टमन पत्रांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन वाचून दाखवतो आहे. प्रदर्शनात हा उपक्रम चांगलेच आकर्षण ठरले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.