Pune Sarpanch Conference: राज्याच्या कृषी व ग्रामविकासाच्या चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ‘सकाळ - ॲग्रोवन’ची सरपंच महापरिषद आता विस्तारत आहे. यंदापासून राज्यात विभाग स्तरावर सरपंच महापरिषद आयोजित करण्यात येणार असून पहिली परिषद पुण्यात होत आहे..ॲग्रोवनच्या सरपंच महापरिषदेकडे कृषी केंद्रित ग्रामीण विकासाच्या ‘ज्ञान जागरा’चे व्यासपीठ म्हणून पाहिले जाते. राज्यातील निमंत्रित सरपंचांचा यात सहभाग असतो. मात्र अधिकाधिक सरपंचांना यात सहभाग घेता यावा म्हणून विभाग स्तरावर सरपंच महापरिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे..पुण्यात लवकरच होणाऱ्या पहिल्या विभागीय सरपंच महापरिषदेला पुणे, सातारा, सोलापूर व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांतील ५०० सरपंच उपस्थित राहणार आहेत. ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या निवडक सरपंचांना या परिषदेसाठी निमंत्रित केले जाणार आहे..FPC Conclave 2025: ‘ॲग्रोवन’तर्फे पुण्यात आज ‘एफपीसी’ महापरिषद.‘सकाळ - ॲग्रोवन’ची पहिली सरपंच महापरिषद १० एप्रिल २०११ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. त्यानंतर सातत्याने या परिषदांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागाचा विकास, शेती व्यवस्थापन आणि सरपंचांना गावच्या विकासासाठी प्रशिक्षित व सक्षम करणे हे हेतू या परिषदेच्या केंद्रस्थानी असतात. आतापर्यंत या महापरिषदांच्या माध्यमातून सात हजार सरपंचांना प्रशिक्षण मिळाले आहे. या परिषदेत आजवर मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, ग्रामविकास क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन सरपंचांना लाभले आहे..कृषी केंद्रित ग्रामविकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची मानून त्यांना अधिकार, हक्क, शासकीय योजना, जलसंधारण आणि आधुनिक शेतीविषयक माहिती या महापरिषदांमधून देण्यात आली. या परिषदेतील प्रशिक्षण व माहितीमुळे ग्रामविकासाच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अंमलबजावणी यात बदल घडून येण्यास मदत होते, असा सरपंचांचा अनुभव आहे. ग्रामविकासात सरपंचांचा सहभाग अतिशय मोलाचा असला तरी त्यांना सातत्याने प्रशिक्षण देणारा उपक्रम सध्या नाही. ‘ॲग्रोवन’च्या सरपंच महापरिषदेने ही उणीव काही अंशी भरून काढली आहे..Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी .सरपंच निवड प्रक्रिया सुरूपुण्यातील विभागीय सरपंच महापरिषदेसाठी चारही जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या गावांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभवी, धडाडीच्या, कर्तव्यदक्ष सरपंचांची निवड करण्याची प्रक्रिया ‘ॲग्रोवन’कडून सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात महिला सरपंचांचा सहभाग देखील मोठा असणार आहे..सहभागासाठी असा भरा अर्ज...क्यूआर कोड स्कॅन कराअधिक माहितीसाठी मोबाइल संपर्क : ९५४५५४१९१७लिंकवर क्लिक करून सहभाग नोंदवा : https://forms.gle/2saY2SqxqMhB7A5i9.राज्य शासन घेते महापरिषदेची दखलसरपंच महापरिषदेत होणाऱ्या चर्चेची नोंद राज्य शासनाकडून घेतली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजातील अडचणींपासून ते पंचायत राज कायद्यातील अधिकारांपर्यंत यापूर्वीच्या महापरिषदांमधून मंथन झाले. या चर्चेत राज्य सरकारमधील मंत्री व उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी सरपंचांकडून महापरिषदेत मांडल्या जाणाऱ्या मागण्या, मतांची नोंद घेत वेळोवेळी सुधारणा करणारे निर्णय जाहीर केलेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.