Pune News: राज्यात कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाकडून विशेष प्राधान्य दिले जात असून, पुणे विभागातील तब्बल ३२३ कृषी पर्यटन केंद्रांना शासकीय मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आल्यामुळे या केंद्रांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे तसेच शहरी पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात नियोजित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी ६ ऑक्टोबर २०२० रोजी राज्य शासनाने कृषी पर्यटन धोरणास मान्यता दिली होती. त्यानंतर पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत आहे..Eco-Agri Tourism : पक्षिनिरीक्षणातून रुजली ‘इको टूरिझम’ची कल्पना.कृषी पर्यटनाचा उद्देशकृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण व राज्याचा विकास साधणेशेती उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणेकृषी पर्यटनाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणेग्रामीण लोककला, संस्कृती व परंपरांचे जतनग्रामीण महिला व तरुणांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे.शहरी नागरिक व विद्यार्थ्यांना शेती व कृषी संलग्न व्यवसायांची माहिती देणेग्रामीण भागातील जीवनमान उंचावणेप्रदूषणमुक्त व निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभव देणेकृषी पर्यटनासाठी बंधनकारक अटीशेती हा मुख्य व्यवसाय आणि पर्यटन पूरक व्यवसाय असावा..Agri Tourism : फळबाग, बांबू वनातील आनंदवन.सातबारा उतारा कुटुंबाच्या नावे असणे आवश्यक.महानगरपालिका व नगर परिषद हद्दीपासून किमान काही अंतरावर ग्रामीण भागात केंद्र असावे.किमान १ एकर शेती क्षेत्र आवश्यक; शालेय सहलींसाठी किमान ५ एकर क्षेत्र बंधनकारक.निवास व्यवस्था पर्यावरणपूरक असावी व सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आवश्यक.भोजन, स्वच्छ पाणी, शौचालय आदी सुविधा पर्यटकांसाठी बंधनकारक..कृषी पर्यटन केंद्रांना मिळणारे शासकीय लाभपर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणपत्राच्या आधारे सुलभ बँक कर्जघरगुती दराने वीज आकारणी व गॅस जोडणीजलसंधारण विभागाच्या शेततळे योजनेत प्राधान्यग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यांसारख्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ.पर्यटन संचालनालयाकडून जिल्हानिहाय वाटप केलेली प्रमाणपत्रेविभाग प्रमाणपत्र वाटपकोल्हापूर २८पुणे १७८सांगली ९सातारा ८६सोलापूर २२.राज्यात कृषी पर्यटन धोरण लागू झाल्यानंतर पर्यटन केंद्रांची नोंदणी वाढत आहे. आतापर्यंत अनेक केंद्रांनी नोंदणी केली असून त्यांच्या केंद्राची पाहणी करण्यात आली आहे. पाहणीनंतर संबंधित केंद्रांना प्रमाणपत्र देण्यात येत असून, त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.भारत लांघी, सहाय्यक उपसंचालक, पुणे विभाग, पर्यटन संचालनालय, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.