Agristack Digital Crop Survey Maharashtra: कृषी उन्नती योजनेंतर्गत २०२६-२७ मध्ये अॅग्रीस्टॅक प्रकल्पातील डिजीटल क्रॉप सर्व्हेसाठी ६६ कोटी ८६ लाख इतक्या निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यात केंद्राचा हिस्सा ४० कोटी ११ लाख ६० हजार आणि राज्याचा हिस्सा २६ कोटी ७४ लाख ४० हजार रुपये इतका आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन विभागाने जारी केला आहे. .राज्यातील कृषी क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे, यासाठी केंद्र शासनाची अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबवली जात आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या शेतांची आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्य शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत. त्यामधील हंगामी पिकांचा माहिती संच अंतर्गत डिजीटल पीक सर्वेक्षण (डिजीटल क्रॉप सर्व्हे) राबविण्यात येत आहे..AgriStack App Registration: एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित.केंद्र शासनाच्या सन २०२६-२७ साठी कृषी उन्नती योजनेंतर्गत अॅग्रीस्टॅक प्रकल्पातील डिजीटल क्रॉप सर्व्हे या घटकासाठी केंद्र हिस्सा ४० कोटी ११ लाख आणि राज्य हिस्सा २६ कोटी ७४ लाख अशा एकूण ६६ कोटी ८६ लाख निधीच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रकल्प मंजुरी समितीने मंजूरी दिलेली आहे. केंद्र शासनाने याची विभागणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७९ टक्के, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२ टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी ९ टक्के याप्रमाणात केली आहे. सदर प्रमाण विचारात घेऊन सदर वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार त्यास मंजुरी देण्यात आली आहे. .AgriStack App Registration: सांगली जिल्ह्यातील अडीच लाख शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’पासून दूर.सदर योजना राबविताना संबंधित शेतकरी लाभार्थी यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी केलेले फार्मर आयडी, शेत जमिनींचे जिओ टॅगिंग झाले आहे, याची खात्री करावी. हा निधी ज्या संवर्गासाठी मंजूर केलेला आहे, त्याच संवर्गासाठी खर्च होईल, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.