Digital Agriculture: कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रीस्टॅक उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती-आधारित निर्णय घेणे सुलभ होईल, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक सेवा पुरविणे शक्य होईल तसेच विविध कृषी उपक्रमांची कार्यक्षमता वाढेल.