Agriculture Workshop Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात आले-हळद, कोथिंबीर, ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो, आंबा लागवडीसाठी चांगला वाव आहे. हे लक्षात घेता शासनाच्या रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, सकाळ व ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि येथील नामांकित उद्योग समूह नाथ बायो जीन्स (इंडिया) लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय मोफत कार्यशाळांचे आयोजन केले आहे. .कार्यशाळेत पहिल्या दिवशी ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो, आंबा पीक लागवड ते काढणी व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन होईल. दुसऱ्या दिवशी कोथिंबीर व आले-हळद पिकांविषयी मार्गदर्शनात रोपवाटिका व्यवस्थापन, लागवडीचे अंतर व पद्धत, खत व्यवस्थापन, फुलधारणा, रोग व कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन तसेच काढणीची माहिती दिली जाईल. कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे..Agriculture Research: आद्य संशोधक शेतकरीच!.फळपीक लागवड कार्यशाळा कधी : २१ फेब्रुवारी वेळ : सकाळी १० कुठे : नाथ ग्रुप कार्यालय, नाथ हाऊस, नाथ रोड, छत्रपती संभाजीनगर आले-हळद, कोथिंबीर लागवड कार्यशाळा कधी : २२ फेब्रुवारी वेळ : सकाळी १० कुठे : पैठण मेगा फूड पार्क, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर.Agriculture Commissioner: शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी एकजुटीने प्रयत्न हवेत: कृषी आयुक्त सूरज मांढरे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.