Kolhapur News:कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील डोंगर व पायथ्याच्या ओसाड जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. बहुतांश लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर सरकारच्या निर्देशानुसार या विभागाकडून प्राथमिक अभ्यास व सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक संभाव्य प्रकल्पांची चाचपणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात दुर्गमानवाड (ता. राधानगरी), उपवडे व दिंडनेर्ली (ता. करवीर), जुळेवाडी खिंड (ता. शाहूवाडी), रामलिंग (ता. हातकणंगले) या ठिकाणांची निवड केली आहे..डोंगरी भागातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने दरवर्षी कोरडवाहू शेतीचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर व उत्पन्नावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यातील संभाव्य डोंगर ओलिताखाली आणण्यासाठी धरणातील शिल्लक पाणी नदीतून उचलून नेण्याचे नियोजन आहे. .Irrigation Project: नामपाडा प्रकल्प पंधरा वर्षांनंतर मार्गी.पाटबंधारे विभागाकडून सध्या नद्यांमधील पाणी कशा पद्धतीने डोंगरावर नेऊन संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आणता येईल, तसेच उर्वरित पाणी सायफनद्वारे डोंगराखालील कोरडवाहू क्षेत्रात सोडून तो परिसर ही ओलिताखाली कसा येईल, या दृष्टीने अभ्यास सुरू केला आहे. पावसाचे प्रमाण, उतार व जलसाठा क्षमता यांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आराखडे तयार केले जातील..Irrigation Project: नामपाडा प्रकल्प पंधरा वर्षांनंतर मार्गी.या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून राज्य सरकारकडे निधीसाठी प्रस्तावही पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येऊन उत्पादनात वाढ होऊ शकते. त्यामुळे डोंगरातील कोरडवाहून शेतीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे..धरणातील शिल्लक पाण्याचा होणार वापरधरणांमध्ये शिल्लक राहिलेले पाणी हे पावसाळ्यापूर्वी सोडण्यात येते. ते पाणी वाया जाऊ नये व त्याचा वापर जास्तीत जास्त कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी होणार आहे. याकरिता नद्यांमध्ये सोडलेले धरणातील हे शिल्लक पाणी शेतीपंपांद्वारे उचलून ते डोंगरावर नेण्याचे नियोजन आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.