Women Farmers : शेतीची सूत्रे महिलांच्या हाती देणार ः पंतप्रधान मोदी

Indian Agriculture : देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. सर्वच आघाड्यांवर महिला पुढे असून, शेतीची सूत्रे पुढे महिलांच्या हाती दिली जातील.
Women Farmer
Women FarmerAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. सर्वच आघाड्यांवर महिला पुढे असून, शेतीची सूत्रे पुढे महिलांच्या हाती दिली जातील. महिलांना ड्रोन पायलट बनविणार आहोत. सरकार महिलांना आधुनिक ड्रोन देऊन शेती विकास, आधुनिकीकरणासाठी काम केले जाणार आहे.

कृषी सखी कार्यक्रम सुरू केला असून, लाखो कृषी सखी गावोगावी पुढील काळात तयार केल्या जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.२५) शहरात आयोजित ‘लखपती दीदी’ मेळाव्यात केली.

Women Farmer
Women Farmer : ओडीशा सरकारची शेतकरी महिलांसाठी ३६७ कोटीची तरतूद

शहरातील विमानतळासमोरील इंडस्ट्रियल पार्क मैदानावर हा कार्यक्रम झाला. या वेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी व ग्रामविकासमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रतापराव जाधव, राज्यातील मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदी व्यासपीठावर होते.

मोदी पुढे म्हणाले, की शेती क्षेत्रात आधुनिकीकरण केले जाणार आहे. महिलांच्या हाती शेतीची सूत्रे दिली जातील. यामुळे रोजगार व आत्मविश्‍वास वाढेल. समाजातही महिलांच्या सामर्थ्याबाबत विश्‍वास वाढणार आहे. महिला, भगिनींसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद वित्तीय संकल्पात करण्यात आल्याचे मोदी म्हणाले. जळगावात मला महाराष्ट्रातील संस्कृती व संस्कारांचे दर्शन घडले आहे. मी नुकताच युरोप दौरा करून परतलो आहे.

तेथेही मला महाराष्ट्राचे दर्शन घडले. पोलंडमधील नागरिक महाराष्ट्रातील लोकांचा मोठा सन्मान करतात. महाराष्ट्राचा विकास करायचा असून, राज्याचे नाव पुढे न्यायचे आहे. येथील मातृशक्तीने देशाला प्रेरणा दिली आहे. जळगाव वारकरी परंपरेचे तीर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनास दिशा देण्याचे काम माता जिजाऊ यांनी केले. सावित्रीबाई फुले यांचे मोठे काम महिलाशक्तीसाठी झाले आहे.

Women Farmer
Women's Farmers Company : महिलांची पहिली शेतकरी कंपनी काढणाऱ्या अनिताताई यांची अनोखी कहाणी

मातृशक्ती देशासाठी नेहमी पुढे आली आहे. महिला देशासाठी सतत काम करीत आहेत. तीन कोटी महिलांना लखपती दीदी करील, असे मी म्हटले होते. मागील १० वर्षांत एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या. तर मागील दोन महिन्यांत आणखी ११ लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांवर आहे, अशा या लखपती दीदींमुळे महिला सशक्तीकरणास बळ येत आहे.

भारत लवकरच जगातील तिसरी अर्थशक्ती बनणार आहे. यात आपल्या महिला. भगिनींचे योगदान आहे. पूर्वी देशातील कोट्यवधी महिलांच्या नावे मालमत्ता नव्हती. त्यांना वित्तीय मदत, कर्ज मिळत नव्हती. नेपाळ येथील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या जिल्ह्यातील भाविकांना आदरांजली वाहून या बाबत केंद्र व राज्य सरकार मदत जाहीर करील. केंद्र सरकार महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी राज्यांसोबत आहे. कठोर कायदे सरकारने महिला अत्याचार दूर करण्यासह दोषींना शासन करण्यासाठी केले आहेत, असे मोदी म्हणाले.

नेपाळ अपघातातील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

केंद्र सरकारने उज्ज्वला योजना व अन्य योजनांच्या मदतीने महिलांच्या आयुष्यात परिवर्तन केले आहे. केंद्राने सोयाबीन, कापूस, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा, त्यांच्या मागण्यांबाबतही कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या नेपाळमध्ये झालेल्या अपघातासंबंधी दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये एवढी मदतही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com