Nilesh Heda : शेतीचा शोध माणसानं नाही तर मुंग्यांनी लावलाय?

Indian Agriculture : मानव पृथ्वीवर येण्याच्या २२ कोटी वर्षांआधी मुंग्यानी शेतीचा शोध लावलेला आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलांमधल्या काही विशिष्ट जातीच्या मुंग्या जमिनीच्या खाली प्रचंड आकाराची वारुळं बनवतात.
Ant
AntAgrowon

Indian Agriculture Update : मानव पृथ्वीवर येण्याच्या २२ कोटी वर्षांआधी मुंग्यानी शेतीचा शोध लावलेला आहे. दक्षिण अमेरिकेतील जंगलांमधल्या काही विशिष्ट जातीच्या मुंग्या जमिनीच्या खाली प्रचंड आकाराची वारुळं बनवतात. त्यात लाखो मुंग्या विशिष्ट जातीच्या वनस्पतींच्या पानांचे तुकडे आणून त्या तुकड्यांवर बुरशी वाढवतात.

ह्या 'लिफ कटर मुंग्या' वाढवलेल्या फंगस वर किटकनाशकांच्या (स्वत:च्या त्वचेतुन स्त्रवलेल्या) फवारण्यासुद्धा करतात बरं का! विशिष्ट काळानंतर त्या बुरशीची कापणी करतात अन त्या बुरशीवर गुण्यागोविंदाने जगतात.

ह्या अक्षरश: करोडोच्या संखेत असलेल्या मुंग्यांनी जर एकाच झाडाच्या पानांचा फडशा पाडायला सुरुवात केली तर एकाच दिवसात ते झाडं निष्पर्ण होऊन जाईल. त्यामुळे त्या मुंग्या शाश्वततेच्या नियमांचं पालन करतात. त्या अनेक झाडांकडून थोडी थोडी पानं घेतात. मानवानं हे शिकायला हवं.

खरं म्हणजे आपली ऊर्जा वाचवण्यासाठी वारुळाच्या जवळ असणाऱ्या झाडांचा फडशा त्यांनी पाडायला हवा. मात्र आपल्या मानवाप्रमाणे एका ओळीत संसाधनांचा वापर करत नाहीत.

Ant
Indian Agriculture : शेतकऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगाराइतके उत्पन्न मिळावे

युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागांत ब्लॅक गार्डन ॲंट नावाची एक मुंगी सापडते. ती अफिड या छोट्याश्या हिरव्या किड्यांचं पशुपालन करते. हा अफिड झाडांच्या पानांवर चरतो आणि आपल्या गुदद्वारातुन साखरेचे द्रावण स्त्रवतो. त्याला मुंग्या खातात. गंमत म्हणजे अफिड उडून जाऊ नयेत म्हणून बरेचदा ह्या मुंग्या अफिडचे पंख कुरतडून टाकतात.

अफिड इकडे तिकडे भटकू नयेत, सुन्न राहावेत म्हणून त्यांना गुंगीत ठेवणारी दारु सुद्धा या मुंग्या त्यांना चाटवतात. आणि शेवटची कडी म्हणजे जर अफिडची संख्या जास्त वाढली तर या मुंग्या बिनधास्त अफिडला हलाल करुन मटन पार्टी सुद्धा करतात!

मुंग्यांना दिवस-रात्रीचे पॅटर्न कळतात. मात्र ज्याला मानव झोप म्हणतो तसं नेमकं किटकांमध्ये नसते. मुंग्यांमध्ये राणी मुंगी ही सर्वात जास्त काळासाठी झोप घेते. साधारणपणे किटकांमध्ये राणी ही सदासर्वदा अंधारात असल्याने प्रकाश आणि अंधाराचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही.

मात्र कामकरी किटक हे स्वत:ची झोप तुकड्यातुकड्यांमध्ये पूर्ण करतात. जेणेकरुन रात्र असो की दिवस काही कामकरी किटक संरक्षण करण्यासाठी तसेच घरट्याची अन्य कामे करण्यासाठी सदैव उपलब्ध असतात. रात्री काम पूर्णत: बंद करुन शांत बसण्याचा स्वभाव मधमाश्यांमध्ये सर्वात प्रखरतेने जाणवतो.

Ant
Agriculture Warehouse : शेतकरी कंपन्यांना गोदाम व्यवसायामध्ये संधी

थोडक्यात किटकांमध्ये दोन प्रकार आहेतः एक सुर्य प्रकाशात काम करणारे आणि दुसरे अंधारात, बिळात राहणारे. त्यांच्यावर दिवस-रात्रीचा फारसा परिणाम होत नाही.

जगभरात मुंग्यांच्या आजवर ओळखल्या गेलेल्या १२ हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत. मुंग्या मानवापेक्षा प्रचंड शक्तिशाली असतात. त्या आपल्या वजनाच्या ५० ते १०० पट वजन उचलू शकतात. इतक्याशा शरीराच्या क्षेत्रफळाचा व्यवस्थित उपयोग व्हावा म्हणून त्यांना फुफ्फुसं नसतात.

छोट्या प्लॉटमध्ये मोठ घर बनवने यालाच म्हणतात. त्यांना कान नसतात मात्र त्या एकमेकांच्या चुगल्या करु शकतात. मुंग्याना दोन पोट असतात, एक स्वत:साठी तर दुसरं आपल्या पिलांसाठी. काही प्रजातीच्या मुंग्या इतर मुंग्याना गुलाम सुद्धा बनवतात.

आणि महत्वाचं डायनोसोरच्या काळी मुंग्या होत्या. डायनोसारच्या काळात झालेल्या प्रलयात अजस्त्र असे डायनोसोर नष्ट झाले मात्र मुंग्यांचा निभाव लागला. थोडक्यात काय तर तुकाराम महाराज द्रष्टे होते. त्यांनी सांगून ठेवलंय- लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।। ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com