Agriculture Conservation : नमामी सातपुड्यातून शेती, वृक्षराजीला बळ

Namami Satpuda Mission : सातपुड्यातील पारंपरिक वाण, स्थानिक वृक्षराजीचे संवर्धन व्हावे, यासाठी नमामी सातपुडा अभियान नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू करण्यात आले आहे.
Agriculture Conservation
Agriculture ConservationAgrowon

Tree Conservation : सातपुड्यातील पारंपरिक वाण, स्थानिक वृक्षराजीचे संवर्धन व्हावे, यासाठी नमामी सातपुडा अभियान नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून पर्वतीय व तीव्र उताराच्या क्षेत्रात केतकी कंदांची लागवड यासह ‘सीसीटी’ची कामेही घेण्यात आली असून यातून शेती, वृक्षराजीला बळ देण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी व अक्कलकुवा भागात हे अभियान सुरू आहे. डोंगर उतारावर शेतीही फुलली आहे. परंतु वृक्षराजी कमी होत आहे. यामुळे सातपुड्यातील कसदार माती वाहून जात आहे. ही समस्या लक्षात घेऊन अक्राणी येथील जलसाक्षरता समिती जलप्रेमी डॉ. एच. एम. पाटील यांच्या संकल्पनेतून नमामी सातपुडा ही मोहीम सुरू झाली आहे.

Agriculture Conservation
Onion Conservation : लासलगाव येथे कांदा संवर्धन चाचणी यशस्वी

पाटील यांची जिल्हास्तरीय जलनायक म्हणून नंदुरबारमध्ये नियुक्ती शासनाच्या यशदा (पुणे) यांनी केली आहे. धडगाव येथील ज. पो. वळवी महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. या उपक्रमास स्थानिक ग्रामस्थ, धडगाव तालुक्यातील काकरदा, वलवाल, आश्‍वथामा विद्यालय, मोलगी येथील महाविद्यालय, अक्राणी येथील ज. पो. वळवी महाविद्यालय आदींनी सहकार्य केले आहे.

या उपक्रमातून ‘सीसीटी’ खोदण्यात आले असून हे काम सुरूच आहे. तसेच काटेरी वृक्ष, बांबू, आवळा आदींची लागवड सातपुड्यात व्यापकपणे केली जाणार आहे. गावोगावी जनजागृतीही करण्यात येत आहे.

आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमंत वळवी, ज. पो. वळवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, अक्राणी, धडगाव भागातील अजित पावरा, जितेंद्र पावरा, दाशा पावरा, जत्र्या पावरा, भरत पावरा, पानसिंग रहासे, लालसिंग वळवी, सुनील परमार, प्रताह रहासे, पंडित गेंद्रे, प्रा. अनिल शिंदे, डॉ. हरिभाऊ पवार, डॉ. सुनील शिंदे, शहादा येथील जायंट्स परिवार आदींची मदत, सहकार्य या अभियानास होत आहे.

Agriculture Conservation
Conservation of Biodiversity : तब्बल १९ हजार झाडांची विविधता जपलेली गमेवाडी

ठळक बाबी

 डॉ. एच. एम. पाटील यांनी घेतलीय पारंपरिक बियाणे व वाण, शेती या विषयात ‘पीएचडी’ची पदवी.

 वनस्पती व शेती या कामात पाटील यांचे झोकून देऊन काम.

 १९९९ पासून सातपुड्यातील पारंपरिक वाणांचे संवर्धन व इतर कार्यवाहीत सक्रिय.

 दरवर्षी अक्राणी येथे पारंपरिक वाणांचे प्रदर्शन. त्यास जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, राहुरी (जि. नगर) येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा आदींची भेट.

 २०१९ मधील प्रदर्शनाला अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची भेट.

मातीची धूप रोखतोय केतकी कंद

केतकी म्हणजे घायपात असून, ही सातपुड्यातील शुष्क वनस्पतीवर्गीय वनस्पती आहे. कमी पाणी किंवा दुष्काळी स्थितीतही हा कंद वाढतो. त्याची पाने जमिनीलगत वाढतात. त्याची उंची चार ते साडेचार फूट असते. त्याची पाने जमिनीलगत पसरत वाढतात. एक मीटर एवढा त्यांचा परीघ असतो.

एवढ्या भागात हा कंद किंवा वृक्ष पाणी व माती धरून ठेवतो. केतकीच्या एका कंदाच्या मदतीने दरवर्षी वाहून जाणारी दोन किलो माती वाचणार आहे. तसेच डोंगरातील पाणी सीसीटीत जाईल. तसेच मातीचे संवर्धन होईल. यामुळे परिसरातील पारंपरिक वृक्ष, शेतीची कसदार माती वाहून जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

- डॉ. एच. एम. पाटील ९४०४८८१५४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com